बारावीत सर्व विषयांत नापास झाला....पण शेवटी IPS चे शिखर गाठलेच.... - failed in all subject in 12th...but become IPS | Politics Marathi News - Sarkarnama

बारावीत सर्व विषयांत नापास झाला....पण शेवटी IPS चे शिखर गाठलेच....

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 8 जुलै 2019

पुणे : बारावीत सर्व विषयांत नापास झालेल्या विद्यार्थ्याची गणना `ढ` विद्यार्थ्यातच होऊ शकते.  पण मनोजकुमार शर्मा या विद्यार्थ्याचे नशीब वेगळेच होते.  काॅपी करता न आल्याने हा विद्यार्थी सर्व विषयांत नापासचा शिक्का बसून वर्गाच्या बाहेर आला. पण नंतर कष्टाने पुढचे शिक्षण पूर्ण करत आयपीएस मनोजकुमार शर्मा बनला.

सध्या दहावी आणि बारावीच्या निकालाची आणि त्यानंतरच्या प्रवेशाची चर्चा सुरू आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर शर्मा यांच्या मार्कांची आणि त्यांनी गाठलेल्या शिखराची चर्चा सोशल मिडियात सुरू आहे. त्यांच्या `ट्वेल्थ फेल` या कामगिरीवर याच नावाने कादंबरी येत आहे. 

मध्य प्रदेशच्या मुरैना जिल्ह्यातील बिलगाव हे सामूहित काॅपीसाठी प्रसिद्ध असलेले गाव होते. त्यामुळे काॅपी करूनच पास व्हायचे हा येथील बहुतेक विद्यार्थ्यांचा फंडा होता. शर्मा देखील या काॅपीवर अवलंबून होते. मात्र ते बारावीला असतानाच तेथे एका कडक अधिकाऱ्याच्या भूमिकेमुळे काॅपीवर बंदी आली. त्यामुळे अनेक विद्यार्थी नापास झाले. त्यात शर्मा तर सर्वच विषयांत नापास झाले. 

ज्या अधिकाऱ्याने ही काॅपीबंदी केली, त्याच्या व्यक्तिमत्त्वाची भुरळ शर्मा यांना पडली आणि त्याच्या प्रमाणे अधिकारी होण्याचे त्यांनी स्वप्न मनाशी गाठले. पदवीचे शिक्षण घेकले. हलाखीच्या परिस्थितीत काम करून त्यांनी दिल्ली गाठली. शिक्षणासाठी पैसे मिळावेत म्हणून अनेक घरगुती कामे केली. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा चार वेळा दिली. चौथ्या प्रयत्नानंतर 121 व्या क्रमांकाने ते युपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यांना आयपीएस पोस्ट आणि महाराष्ट्राचे केडर मिळाले. 

युपीएससी परीक्षेतील मुलाखतीचा किस्साही त्यांचा रंजक आहे. त्यांचा सारा संघर्ष त्यांचे मित्र अनुराग पाठक यांनी ट्वेल्थ फेल या पुस्तकात मांडला आहे. 

मनोज शर्मा हे सध्या मुंबईत अतिरिक्त पोलिस आयुक्त आहे. गडचिरोली, कोल्हापूरचे पोलिस अधीक्षक म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. पोलिस अधिकारी सुवेझ हक, वीरेश प्रभू आणि शर्मा यांच्या मैत्रीची गोष्टही अनेकांना अचंबित करणारी आहे. हे तीन पोलिस अधिकारी एकमेकांचे जवळचे मित्र म्हणून ओळखले जातात. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख