फडणवीस यांना टीव्हीवर आपले कायद्याचे ज्ञान दाखवायचे होते : रोहित पवार    - Fadnavis wanted to exibit his knowlede on TV : Rohit Pawar | Politics Marathi News - Sarkarnama

फडणवीस यांना टीव्हीवर आपले कायद्याचे ज्ञान दाखवायचे होते : रोहित पवार   

संपत मोरे
शनिवार, 30 नोव्हेंबर 2019

देवेंद्र फडणवीस यांना आपल्याला नियम किती कळतात,कायदा किती कळतो हे टीव्हीसमोर दाखवायचं  होते   -रोहित पवार

पुणे-"देवेंद्र फडणवीस यांना आपल्याला नियम किती कळतात,कायदा किती कळतो हे टीव्हीसमोर दाखवायचं होतं म्हणूनच त्यांनी विधानसभेत गोंधळ घातला,"असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केला.

विधानसभेत बहुमत ठरावदरम्यान माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही मुद्दे उपस्थित केले.त्यानंतर भाजपने सभात्याग केला. त्यावर आमदार पवार यांनी प्रतिक्रिया दिली.पवार म्हणाले,"मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वागत तसेच अन्य मंत्र्यांचे स्वागत करण्याचा आजचा दिवस होता मात्र माजी मुख्यमंत्र्यांनी नुसता गोंधळ घातला.त्यांचा पक्ष गोंधळ घालणारा पक्ष आहे."

आगामी काळात भाजपचे आमदार  आक्रमकपणा करायला लागले तर तुम्ही काय करणार?असे विचारता पवार म्हणाले"आम्ही संसदीय पध्दतीने त्यांना उत्तर देऊ.आणि विरोधक जर राज्याच्या हिताचा मुद्दा मांडत असतील तर त्यांच्या पाठीशी राहू."

"माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचा सुद्धा अपमान केला आहे. स्वतःला कायदा किती कळतो हे त्याना टीव्हीवर लोकांना दाखवायचे असेल.विधीमंडळातील प्रकार महाराष्ट्राच्या जनतेने  बघितला आहे," असेही ते म्हणाले. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख