... फडणवीसांना शोले मधील अमिताभने धर्मेंद्रची मावशीकडे केलेली तारीफ आठवली

महाराष्ट्र विधानसभेमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या अभिनंदनाचा ठराव झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस या ठरावाला उत्तर देताना बोलत होते .
Fadnavis remembers sholay
Fadnavis remembers sholay

मुंबई  : विरोधी पक्षनेतेपदी निवड  झाल्यावर काही नेत्यांनी माझया विषयी चार चांगले शब्द बोलताना केलेली विधाने ऐकल्यावर  शोले सिनेमामध्ये अमिताभ बच्चनने धर्मेंद्रच्या लग्नासाठी मावशीकडे केलेली तारीफ यानिमित्ताने आठवली,  असे देवेंद्र फडणीस यांनी सभागृहात सांगितले आणि एकच हशा उसळला. 

महाराष्ट्र विधानसभेमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या अभिनंदनाचा ठराव झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस या ठरावाला उत्तर देताना बोलत होते . देवेंद्र फडणवीस म्हणाले, की माझे अभिनंदन करणारी अनेक भाषणे झाली.  परंतु काही भाषणे ऐकल्यानंतर मला शोले मधील अमिताभ बच्चन  आठवले .  धर्मेंद्रच्या लग्नासाठी मागणी घालायला गेल्यानंतर मावशीकडे अमिताभ बच्चन 'लडका अच्छा है 'असे म्हणत जे काही बोलतो ते आठवले, अशी देवेंद्र फडणवीस म्हणाले आणि एकच हशा उसळला. 

बाळासाहेब थोरात यांनी म्हटल्याप्रमाणे विरोधी  पक्षाची भूमिका आमच्या डीएनएमध्येच आहे , हे मान्य करून देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले,  मी अधिनियमाच्या पुस्तकाच्या आधारे आणि संविधानाच्या आधारित मुद्दे  मांडतो . कालही मी नियम आणि संविधानानुसार मुद्दे मांडले होते . परंतु अध्यक्षांचा निर्णय अंतिम असतो आणि तो मी मान्य केला . परंतु अध्यक्षांचा निर्णय आम्हाला  पटला नाही म्हणून आम्ही सभात्याग केला.  कालच्या प्रसंगाचे चुकीचे इंटरप्रिटेशन झालेले आहे . जयंतरावांनी काल शपथेचा मुद्दा उपस्थित करताना त्याला वेगळे वळण देण्याचा नेहमीप्रमाणे प्रयत्न केला . 

फडणवीस पुढे म्हणाले , आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊनच सत्तेवर आलो होतो . मात्र आम्ही कधीही राजे झालो नाही.  आम्ही सेवकाच्या भूमिकेत राहिलो.  छत्रपती शिवाजी महाराज , हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, क्रांतिसूर्य महात्मा फुले ,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, भारतरत्न महामानव बाबासाहेब आंबेडकर ही  नावे वंदनीयच आहेत. यांचे  केव्हाही स्मरण केले तरी वंदनीय आहे.  मात्र बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये जो प्रोफॉर्मा घालून दिला त्या तरतुदीचे पालन करून  मंत्र्यांचा  शपथविधी झाला असता तर आम्हाला अधिक आनंद झाला असता . बाबासाहेबांनी घटनेमध्ये केलेल्या तरतुदींचे पालन करतील त्यांना त्यांचे नाव घेण्याचा अधिकार आहे असे मला वाटते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com