` देवेंद्र फडणवीस हे आमचे आयडाॅल...त्यांना दिल्लीत नेऊ नका`

...
sudarshn choudhari and ex cm fadnavis
sudarshn choudhari and ex cm fadnavis

लोणी काळभोर :  माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या सर्व तरुण पिढीचे आयडॉल आहेत. त्यांना दिल्लीत नेऊ नका. मोदीजींच्या स्वप्नातील आदर्श महाराष्ट्र आम्हा तरुणांना उभा करायचाय, असे लेखी निवेदन पुणे जिल्हा भाजपा युवा मोर्चाने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहांना पाठविले आहे.

देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत नेण्याच्या हालचाली पक्षपातळीवर जोरात आहेत. खुद्द फडणवीस यांनी याबाबत जाहिर खुलासा करुन आपण दिल्लीत जाणार नाही, महाराष्ट्रात भाजपाची सत्ता आणल्याशिवाय दिल्लीच्या राजकारणात पाय ठेवणार नाही असे म्हणत असले तरी पक्षाच्या वरिष्ठ सूत्रांच्या माहितीनुसार फडणवीस यांना केंद्रात घेणार असल्याची चर्चा आहे.

याच पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष सुदर्शन चौधरी यांनी एक लेखी पत्र नुकतेच गृहमंत्री अमित शहांना पाठविले असून त्यात फडणवीस यांच्या गेल्या पाच वर्षांतील कार्यकर्तूत्वाचा आढावा घेतला आहे. 

मराठा आरक्षण, पुण्यासाठी पीएमआरडीएची रखडलेली स्थापना, जलयुक्त शिवार योजना, पुणे मेट्रो प्रकल्प, शेतकरी कर्जमाफी, सहकार क्षेत्राचे पुनर्जिवन, जनतेतून नगराध्यक्ष व सरपंच निवड, पीकविमा योजनेची काटेकोर अंमलबजावणी आदींसह अनेक प्रश्नांबाबत फडणवीस यांची निर्णायक भूमिका व झालेले निर्णय याबाबत खुलासेवार माहिती सदर पत्रात दिली असून अशा तरुण नेतृत्वाला दिल्लीत नेवून महाराष्ट्रात चांगल्या नेतृत्वाची पोकळी निर्माण न करण्याची विनंती करण्यात आली आहे. महाराष्ट्रात पुन्हा भाजपाची सत्ता लवकरच यायची असेल तर फडणवीस दिल्लीत नेवू नका ते महाराष्ट्रातच ठेवा, अशी नंतीही या पत्रात करण्यात आली आहे.

राजकारण शिवसेनेलाच जमते असे समजू नये म्हणून हे पत्र : चौधरी

निवडणुकीपूर्वीची भाषा आणि त्यानंतरचे शिवसेनेचे वर्तन हे नैतिकतेला धरुन नाही. शिवसेनेने केलेले राजकारण हे त्यांनाच समजते असे, त्यांनी समजू नये. त्यामुळे ज्या पध्दतीने त्यांनी केले त्याच पध्दतीने भाजपा पुणे जिल्ह्यात राजकारण करेल आणि लवकरच शिवसेनेलाही ते समजेल, असा इशारा देण्यात आला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com