फडणविसांनी मला नेमले पण ठाकरे यांनीही `कंटिन्यू` केले...

...
narendra patil-uddhav
narendra patil-uddhav

रत्नागिरी ः आंबा, काजू, फणसाच्या बागेतून मिळणाऱ्या उत्पन्नात आपले भागतेय तर व्यवसाय कशाला हवा, ही मानसिकता कोकणातील तरुणांनी बदलली पाहिजे. उद्योग-व्यवसायासाठी कर्ज घेण्यासाठी पुढे या. कर्ज घेताना बॅंकेत कुणी आडकाठी आणली तर महामंडळाच्या समन्वयकाशी संपर्क साधा, असे आवाहन आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केले.

जिल्हा परिषद येथील लोकनेते श्‍यामराव पेजे सभागृहात मराठा समाजातील युवक-युवतींसाठी या महामंडळाच्या विविध योजनांची माहिती व मार्गदर्शन मेळावा झाला. त्या वेळी विजय राणे, तसेच रत्नागिरीतील मराठा मंडळाचे अध्यक्ष केशवराव इंदुलकर, हरिश्‍चंद्र देसाई, संतोष तावडे, हरिश्‍चंद्र देसाई आदी उपस्थित होते.

महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील म्हणाले, 1998 मध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, तत्कालीन माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे हे महामंडळ अस्तित्वात आले. त्यासाठी बाळासाहेब ठाकरे व आण्णासाहेब पाटील यांच्यात त्या वेळी सामाजिक कार्याबाबत चांगले संबंध होते. पण 1999 नंतर राज्यात सत्तांतर झाले. त्यामुळे हे महामंडळ चांगले चालले नाही. मराठा समाजाला न्याय द्यायचा असेल तर महामंडळ पूर्ण जिवंत राहणे गरजेचे आहे. त्यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली होती.

हे महामंडळ 2018 ला सुरू झाले. त्यावेळी 100 इतर लाभार्थी होते. त्याबाबत राज्यभर दौरे केले. लाभार्थ्यांना भेटून त्याचे महत्व पटवून दिले. त्यावेळी बॅंकांकडून कर्ज देण्यासाठी नकारात्मक भूमिका घेतली जात असल्याची कैफियत माझ्यापुढे मांडण्यात आली होती. या महामंडळाचे महत्व लोकांना पटू लागल्यामुळे लाभार्थ्यांची संख्या 13 हजारापर्यंत पोहोचली आहे. याचे श्रेय मराठा समाजातील तरूणांना द्यायला हवे, असे त्यांनी सांगितले.

पुन्हा माझ्याकडे जबाबदारी
विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्यावर या महामंडळाची जबाबदारी पुन्हा दिली आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्गातून मला जास्तीत जास्त उद्योजक तयार करायचे आहेत. त्यासाठी तरूणांनी पायावर उभे राहण्याची मानसिकता निश्‍चित करा, असे त्यांनी आवाहन केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com