fadanvis will become cm again : shivtare | Sarkarnama

फडणवीसच होतील पुन्हा मुख्यमंत्री : नितीन गडकरी

अतुल मेहेरे
सोमवार, 21 ऑक्टोबर 2019

नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महाल येथील महापालिकेच्या कार्यालयात कुटुंबीयांसह मतदानाचा हक्क बजावला.

नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महाल येथील महापालिकेच्या कार्यालयात कुटुंबीयांसह मतदानाचा हक्क बजावला.

मतदान हा लोकशाहीचा सर्वांत मोठा उत्सव आहे. मतदान करणे लोकतांत्रिक अधिकार असून, त्याचा वापर लोकशाही बळकट करण्यासाठी करा. पाच वर्षांमध्ये देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात तर राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात मोठा विकास झाला आहे. विकासाच्या बळावर जनता भाजपसोबत आहे. निवडणुकीत भाजप रेकॉर्डब्रेक मताधिक्‍याने विजयी होईल. तसेच देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होतील, अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मतदानानंतर व्यक्‍त केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांनी जनतेला मतदानासाठी मोठ्या संख्येने बाहेर पडण्याचे आवाहन केले.

महाराष्ट्रात लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव सुरु आहे. मी सहकुटुंब मतदान केल आहे. जनतेला आवाहन आहे की, त्यांनीही मतदान कराव. सरकारकडून जनतेच्या अपेक्षा, आकांक्षा असतात. त्यासाठी मतदान केल पाहीजे. अपेक्षा करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. त्यामुळे सगळ्यांनी मतदानासाठी बाहेर पडल पाहीजे. आचारसंहीता सुरु आहे. मतदान सुरु आहे. त्यामुळे मला अधिक काही बोलता येणार नाही. आचारसंहीतेचा भंग होईल, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. मुख्यमंत्री नागपुरच्या दक्षिण-पश्‍चिम मतदार संघातून निवडणूक लढवित आहेत. त्यांच्यासमोर कॉंग्रेसच्या आशीष देशमुखांचे आव्हान आहे.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख