नागपूर येथे पावसाळी अधिवेशनासाठी फडणवीस - उद्धव ठाकरेंत होणार चर्चा 

येत्या 4 जुलैपासून सुरू होणारे विधिमंडाचे पावसाळी अधिवेशन नागपूरमध्येआयोजित करण्याचा निर्णय मंत्री समितीने घेतला आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यात चर्चा झाल्यानंतर पावसाळी अधिवेशन नागपूरमध्ये घेण्याबाबत पुढील आठवड्यात अधिकृत घोषणा होईल.
Thakrey-CM-Nagpur-seccsion.jpg
Thakrey-CM-Nagpur-seccsion.jpg

मुंबई  :येत्या 4 जुलैपासून सुरू होणारे विधिमंडाचे पावसाळी अधिवेशन नागपूरमध्येआयोजित करण्याचा निर्णय मंत्री समितीने घेतला आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यात चर्चा झाल्यानंतर पावसाळी अधिवेशन नागपूरमध्ये घेण्याबाबत पुढील आठवड्यात अधिकृत घोषणा होईल.

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन नागपूरमध्ये व्हावे यासाठी भाजप आग्रही आहे. यासंदर्भात गटनेत्यांशी चर्चा करून निर्णय घेण्यासाठी मंत्री समिती नेमण्यात आली आहे. वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, उद्योग मंत्री सुभाष देसाईआणि संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांच्या समितीची मंगळवारी मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीत पावसाळी अधिवेशन नागपूरमध्ये घेण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन दरवर्षी नागपूरमध्ये घेण्याची प्रथा आहे. नागपूर अधिवेशनात प्रमुख्याने विदर्भ आणि मराठवाड्याच्या प्रश्नांवर चर्चा होते.अधिवेशनात होणार्या चर्चेच्या अनुषंगाने निधी देताना मार्च महिना उजाडतो. तसेच पुरवणी मागण्यांमधूनही विदर्भाला न्याय मिळत नाही, अशी सरकारची भावना आहे.त्यामुळे पावसाळी अधिवेशन नागपूरमध्ये घेण्याबाबत मुख्यमंत्री आग्रही होते. नागपूरमधील अधिवेशनासाठी विरोधी पक्षही अनुकूल आहे. त्यामुळे उध्दव ठाकरे यांच्यासोबत औपचारिक चर्चा झाल्यानंतर पावसाळी अधिवेशन नागपूरमध्ये घेण्याबाबत घोषणा केली जाणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com