स्वयंसेवकाच्या गणवेशात मुख्यमंत्री फडणवीस व गडकरी  

Fadnvis-Gadkari-&-RSS
Fadnvis-Gadkari-&-RSS

नागपूर :  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजया दशमी कार्यक्रमात स्वयंसेवकाच्या गणवेशात हजेरी लावली. 

 या दोन्ही नेत्यांनी रेशिमबाग येथे पोहोचण्यासाठी सरकारी वाहनांचा वापर केला नाही.  हे दोन्ही नेते बाल स्वयंसेवक राहिले आहेत. तेव्हा पासून रेशिमबाग येथे होणाऱ्या विजया दशमीच्या कार्यक्रमाला ते आवर्जून हजेरी लावतात. पदावर पोहोचल्यावर ही या शिरस्त्यात कोणताही बदल झाला नाही.

गडकरी आमदार ,मंत्री, विरोघी पक्षनेते, खासदार व आता मंत्री राहिल्यानंतरही निमंत्रित लोकांसाठी राखीव राहत असलेल्या शामियानात ते बसतात. हाच परिपाठ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाळला आहे रेशिमबाग येथे होणाऱ्या या कार्यक्रमासाठी  ते सरकारी गाडीचा वापर करीत नाही. हे दोन्ही नेते खासगी वाहनांचा वापर करून रेशिमबागेत येतात.

आज विजयादशमीच्या मेळाव्यात स्वयंसेवकांचे पथसंचलन व कवायतीही झाल्या.व्यासपीठावर  सरसंघचालक डॉ . मोहन भागवत ,  नोबेल विजेते कैलाश सत्यार्थी,  प्रांत संघचालक राम हरकरे, महानगर संघचालक राजेश लोया, महानगर सहसंघचालक श्रीधर गाडे यांची उपस्थिती होती.  

तर निमंत्रितांच्या कक्षात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते व भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पद्मश्री उस्ताद रशीद खाँ व त्यांच्या पत्नी सोहा खान, केरळचे केंद्रीय राज्यमंत्री के.जे. अँथोन्स, आळंदीचे रामूजी महाराज आदींची उपस्थिती होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com