Fadanvis -Danve to hold meeting with MLAs on 19 December | Sarkarnama

फडणवीस - दानवे घेणार  19 तारखेला आमदारांची बैठक

सरकारनामा
शनिवार, 15 डिसेंबर 2018

.

मुंबई :  पाच राज्यातील  निकालांनी भाजपमय वातावरणाबददल प्रश्‍न निर्माण केले असतानाच पक्षाने 19 डिसेंबर रोजी आमदारांची बैठक़ बोलावली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपप्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे या बैठकीला संबोधित करतील. राज्यातील महत्वाचे प्रश्‍न तसेच अन्य आव्हानांचा या बैठकीत विचार केला जाईल.

नवी दिल्लीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याशी रावसाहेब दानवे तसेच आशीष शेलार यांनी संवाद साधला. या वेळी महाराष्ट्रासमोरचे निवडणूक प्रश्‍न तसेच पक्षातर्फे हाती घ्यावयाचे अभियान यावर सविस्तर चर्चा झाली. 

लाभार्थी कुटुंबांशी संवाद साधण्याची गरज आहे,ते काम भारतीय जनता युवा मोर्च्याने करावे अशी अपेक्षा शहा यांनी व्यक्‍त केली आहे. महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या निर्णयाचा लाभ होईल काय , ओबीसी समाजाला समवेत कसे ठेवता येईल या सर्व विषयांचा अंदाज घेणे सध्या सुरू आहे. महाराष्ट्रात शिवसेनेचे पुढचे नियोजन कसे असेल यावरही लक्ष ठेवले जाते आहे.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख