कॉंग्रेस-आघाडीेने प्रचारासाठी भाड्याने आणले बंद पडलेले इंजिन :फडणवीस

जे क्रिकेट खेळताना पहिल्याच चेंडून आऊट होतात. ज्यांना आपला पक्ष सांभाळता येत नाही, त्यांनी आम्हाला शिकवू नये.- देवेंद्र फडणवीस
कॉंग्रेस-आघाडीेने प्रचारासाठी भाड्याने आणले बंद पडलेले इंजिन :फडणवीस

पुणे : कॉंग्रेस-आघाडीकडे प्रचारालादेखील माणूस नाही. यावर उपाय म्हणून त्यांनी राज ठाकरे यांचे इंजिन भाड्याने आणले. मात्र, हे इंजिन बंद पडलेले आहे. त्याचा काहीही उपयोग नाही, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

बारामती लोकसभा मतदारसंघातील भाजपाच्या उमेदवार कांचन कुल यांच्या प्रचारासाठी पुण्यात खडकवाला विधानसभा मतदारसंघात आयोजित सभेत बोलताना त्यांनी कॉंग्रेस आघाडीसह राज ठाकरे यांच्यावर टीका केली.

मुख्यमंत्री म्हणाले, " कॉंग्रेस आघाडीने आणलेले हे इंजिन बंद पडलेले असल्याने त्यांचा त्याचा काहीही उपयोग होणार नाही. राज ठाकरे यांनी 2014 मध्ये मोदी यांच्यासंदर्भात केलेल्या भाषणांच्या ध्वनिचित्रफिती लोकांना दाखविल्या तर तुमची काय अवस्था होईल. कॉंग्रेसवाल्यांना मोदींच्या पायाचे तीर्थ पिण्याचे सल्ले देणारे राज ठाकरे आता काय बोलत आहेत हे त्यांचे त्यांनाच कळत नाही." 

" जे क्रिकेट खेळताना पहिल्याच चेंडून आऊट होतात. ज्यांना आपला पक्ष सांभाळता येत नाही, त्यांनी आम्हाला शिकवू नये. पुण्यात रिंगरोड, मेट्रो, विमानतळासारखी कामे धडाक्‍याने मार्गी लावण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली झाले आहे. देशाला विकासाच्या दिशेने नेताना सुरक्षित कोण ठेऊ शकते ही ठरविणारी ही निवडणूक आहे. शेती, विमा, घरकुल योजनांचा पैसा थेट नागरीकांपर्यंत पोचवला."

" पुण्याला स्मार्ट सिटी योजना दिली. 2022 पयर्यंत देशात कुणीच बेघर राहणार नाही हे पंतप्रधान मोदी यांचे लक्ष्य आहे. देशातील पन्नास कोटी लोकांना पाच लाख रूपयांचे आरोग्य सुरक्षा कवच केवळ भाजपा सरकारने दिले आहे. या साऱ्या कामांमुळे विरोधकांचे धाबे दणाणले आहे. सत्तेपासून आपण खूपच दूर जात असल्याच्या भावनेतून कॉंग्रेस आघाडी नैराश्‍याच्या गर्तेत जात असून त्यातूनच आरोप करण्यात येत आहेत,''  मुख्यमंत्री म्हणाले . 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com