fadanvice government vighna ashok chavan | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

उन्मेश जोशी यांची ईडीकडून गेल्या पाच तासापासून चौकशी

फडणवीस सरकार राज्यावरचे विघ्न, ते टळू दे : अशोक चव्हाण 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 4 डिसेंबर 2018

कळंब (जि. यवतमाळ) ः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे राज्यातील सरकार हे लोकांसाठी विघ्न ठरले असून या विघ्नापासून जनतेची लवकर सुटका करावी, असे साकडे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी कळंबच्या चिंतामणीच्या गणपतीला घातले. 

कॉंग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेच्या चौथ्या टप्प्याला आज यवतमाळ जिल्ह्यातील कळंब येथून सुरूवात झाली. ही यात्रा यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्ह्यांमध्ये फिरणार आहे. यावेळी बोलताना चव्हाण म्हणाले, की गेल्या चार वर्षांपासून फडणवीस सरकार राज्यात सत्तेवर आहे. या सरकारने समाजातील कोणत्याही वर्गाच्या विकासाला चालना दिली नाही. राज्य सरकारच्या कर्जमाफीच्या योजनेचा बोजवारा उडाला आहे. राज्य सरकार कर्जाच्या ओझ्याखाली आले आहे. फडणवीस सरकार एक विघ्न म्हणून राज्यात अवतरले आहे. 

यावेळी माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी मंत्री वसंतराव पुरके, शिवाजीराव मोघे, माजी उपसभापती माणिकराव ठाकरे, यवतमाळ जिल्हा कॉंग्रेसचे अध्य वजाहत मिर्झा, नागपूरचे माजी महापौर विकास ठाकरे आदी उपस्थित होते. 
 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख