अबब! फडणवीस सरकारने टिव्ही-रेडिओच्या जाहिरातींवर केला 'एवढा' खर्च

राज्य सरकारने सन 2015-16 ते 2019-20 या कालावधीत केवळ टीव्ही व रेडीओवरील जाहिरातींसाठी तब्बल 15 कोटी 28 लाख रूपयांचा खर्च केला आहे.यामधला नोव्हेंबर 2019 नंतरचा काळ वगळला तर हा सर्व खर्च फडणवीस सरकारच्या काळात झालेला आहे
Fadanavis Government Huge Expenses on TV Radio Advertisement
Fadanavis Government Huge Expenses on TV Radio Advertisement

सोमेश्वरनगर : राज्य सरकारने सन 2015-16 ते 2019-20 या कालावधीत केवळ टीव्ही व रेडीओवरील जाहिरातींसाठी तब्बल 15 कोटी 28 लाख रूपयांचा खर्च केला आहे.  यामधला नोव्हेंबर 2019 नंतरचा काळ वगळला तर हा सर्व खर्च फडणवीस सरकारच्या काळात झालेला आहे. सरासरी पाहिली तर दररोज सुमारे 83 हजार रूपये टिव्ही रेडिओच्या जाहिरातींवर खर्च केल्याचे दिसते. 

केंद्र सरकारप्रमाणेच फडणवीस सरकारही मिडियावर मेहरबान होते. माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांना माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने प्राप्त झालेल्या माहितीनुसार आघाडी सरकारने शेवटचे वर्ष असताना 2013-14 मध्ये रेडीओवर 59 लाख 96 हजारांची तर टीव्हीवर 53 लाख 25 हजारांची खैरात केली होती. यानंतर 2014-15 ची माहिती जनसंपर्क व माहिती संचलनालय देऊ शकले नाही. 

ऑक्टोबर 2014 मध्ये शपथविधी नंतर फडणवीस सरकारने आघाडी सरकारपेक्षा कित्येक पटीने जाहिरातबाजी सुरू केली. 2015-16 मध्ये रेडिओवर 84 लाख 84 हजार रूपयांच्या तर टीव्हीवर 66 लाख 42 हजार रूपयांचे जाहिरात मूल्य अदा केले. 2016-17 हा फडणवीस सरकारचा मध्यकाळ जरा बरा गेला. पण त्यानंतर निवडणुका जवळ आल्याने पुढची दोन्ही वर्ष कोटी कोटी उड्डाणाची बनली! 2017-18 मध्ये रेडीओला 1 कोटी 20 लाख रूपयांच्या तर टीव्हीला तब्बल 5 कोटी 99 लाख रूपयांच्या जाहिराती देण्यात आल्या होत्या. 

पुन्हा 2018-19 मध्ये रेडीओवर 1 कोटी 85 लाखांची तर टीव्हीवर 2 कोटी 84 लाखांची फडणवीस सरकारने 'मन की बात' केली. आचारसंहिता लागू झाल्यावरच फडणवीस सरकारची जाहिरातबाजी थंडावली. एप्रिल 2019 नंतर 21 जानेवारीपर्यंत 11 लाख 32 हजार रूपये रेडीओला तर 83 लाख 74 हजार रूपये टीव्हीला जाहिरातीपोटी अदा केले आहेत. 2014-15 चा खर्च मिळाला असता तर शपथविधीच्या वेळच जाहिरातींचा खर्चही समजला असती.

याबाबत नितीन यादव म्हणाले, ''निवडणूकपूर्व 2017-18 मध्ये तर सात कोटींपेक्षा जास्तीचा खर्च तर डोळे पांढरे करायला लावणारा आहे. फडणवीस सरकारचा केवळ विमान उड्डाणाचा खर्चही 57 कोटी 62 लाख रूपये इतका असल्याचे यापूर्वी सिध्द झाले आहे. जनतेच्या पैशांची ही लूट आहे.

वर्षनिहाय खर्त (सर्व आकडे रुपयांत)

माध्यम 2013-14 2016-17 2015-16    2017-18   2018-19  2019-20     
रेडीओ 59,96,281 84,84,989 46,96,870 1,20,69,877 1,85,72,887  

11,32,149 

टीव्ही    53,25,703 66,42,364  44,63,088 5,99,97,520 2,84,48,317   83,74,914

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com