fadanavice ministers unhappy with officers | Sarkarnama

नोकरशाहीपुढे फडणवीस सरकारचे मंत्री हतबल 

प्रशांत बारशिंग 
शनिवार, 11 ऑगस्ट 2018

मुंबई, : फडणवीस सरकारमधील मंत्र्यांच्या कार्य पद्धतीवर नाराज असलेल्या नोकरशाहीने मंत्र्यांच्या आदेशाला कात्रजचा घाट दाखविण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे निवडणुकीला जेमतेम एक वर्ष शिल्लक असताना मंत्री हवालदिल झाले असून कामे होत नसल्याने मंत्री कार्यालकडे आमदार-खासदार आणि कार्यकर्त्यांनी पाठ फिरवल्याचे सध्याचे चित्र आहे. 

ऑक्‍टोबर 2014 मध्ये राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पावलावर पाऊल टाकत भाजपच्या सर्वच मंत्र्यांनी त्यांच्या कार्यालयात ओएसडी म्हणून खाजगी व्यक्तीचा भरणा केला. या मंडळीनच्या हातात सत्ता आल्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांना आदेश सोडने (आयएएस अधिकाऱ्यांसह), महत्वाच्या फाईल्स हाताळने, महत्त्वाच्या बैठकांचे धमकी वजा आदेशात निरोप देणे, बैठक आणि कामे संपली तरी ताटकळत बसवून ठेवणे असले उद्योग सुरु केले. 

कामांचा पाठपुरावा करताना चुकीच्या पद्धतीने मंत्र्यांचे कान भरुन त्यांच्याकडून नोकरशाहीचा अपमान करणे, यामुळे प्रशासनातले अधिकारी खवळले आहेत, त्यातच सातव्या वेतन आयोगाला विलंब होत असल्याने जानेवारी 2018 पासुनच प्रशासन नाराज असल्याने मंत्र्यांची कामे ठप्प आहेत. 

इतर वेळी मंत्री कार्यालयात आमदार-खासदार, कार्यकर्ते आणि सामान्य लोकांचा राबता असतो, तसा आताही होता, मात्र प्रशासनात कामेच होत नसल्याने गेल्या आठ दहा महिन्यापासुन लोकांनी पाठ फिरवल्यावर मंत्री कार्यालये ओस पडत आहेत.

मंत्रिमंडळ बैठकीच्या दिवशी थोडी गर्दी असते, मात्र त्या गर्दी सामान्य चेहरा दिसायचा बंद झाला असून फक्त जैकेट वाल्यांचीच लगबग सुरु असते. या पार्श्वभूमीवर निवडणुकीला एक वर्ष बाकी राहिल्याने मंत्र्यांची अस्वस्थता वाढत असल्याची माहिती मंत्री आस्थापने वरून मूळ विभागात परतलेले अधिकारी खाजगीत सांगत आहेत.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख