नागपुरात रंगला युवक कॉंग्रेस विरुद्ध शहर कॉंग्रेस सामना

नागपूर महापालिकेत विरोधी पक्षनेत्यांच्या दालनात खुर्त्यांची फेकाफेक झाली. त्यामुळे नागपुरातील काँग्रेस व युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये असलेवी गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे
Factionalism in Congress and Youth Congress Surfaced in Nagpur
Factionalism in Congress and Youth Congress Surfaced in Nagpur

नागपूर : शहर कॉंग्रेसला गटबाजीचे ग्रहण अद्यापही कायम आहे. सोमवारी विरोधी पक्षनेत्यांच्या कक्षात खुर्च्यांच्या फेकाफेकीमुळे शहर कॉंग्रेस व युवक कॉंग्रेस परस्परांपुढे उभी ठाकली. शहर कॉंग्रेसने युवक कॉंग्रेसवर गुंडगिरीचा आरोप करीत महापालिका आयुक्तांकडे गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. शहर कॉंग्रेसने यावेळी महापालिकेतील सुरक्षा यंत्रणेवरही प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले.

सोमवारी दुपारी युवक कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष तौसिफ खान व इतर पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मनपातील विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांच्या कक्षात खुर्च्यांची फेकाफेक केली. युवक कॉंग्रेसच्या या कृत्यावर कॉंग्रेस नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनीही नाराजी व्यक्त केली. या घटनेने कॉंग्रेसमधील गटबाजी पुन्हा चव्हाट्यावर आली. या घटनेतील युवक कॉंग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांवर कारवाईची मागणी करीत शहर कॉंग्रेसचे सचिव चंदू वाकोडकर यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने मनपा आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेतली. विरोधी पक्षनेत्याच्या कक्षात शिरून शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी या गुंडांवर कारवाई करा, अशी मागणी शिष्टमंडळाने केली. 

या घटनेतून महापालिकेच्या सुरक्षा यंत्रणेचेही पितळ उघडे पडल्याकडे आयुक्तांचे लक्ष वेधण्यात आले. या गुंडांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी शिष्टमंडळाने आयुक्तांकडे केली. त्यामुळे शहरात युवक कॉंग्रेसविरुद्ध शहर कॉंग्रेस असा सामना रंगल्याचे चित्र दिसत आहे. शिष्टमंडळात ब्लॉक अध्यक्ष अयाज शेख, शहर कॉंग्रेसचे माजी महासचिव जमीर शेख, पूर्व नागपूर युवक कॉंग्रेसचे उपाध्यक्ष आदिल शेख, अक्षय डोर्लीकर, धीरज डहाके, निखिल कुंटे, नितेश चंद्रिकापुरे, श्रीकांत कैकाडे, रूपेश चौरसिया, शैलेश गुमगावकर, गौरव मोटघरे, किशोर उदापुरे आदींचा समावेश होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com