या मतदारसंघात एकदा आमदार झालेला परत निवडून येत नाही....

या मतदारसंघात एकदा आमदार झालेला परत निवडून येत नाही....

हडपसर : हडपसरमधून महाआघाडीचे उमेदवार चेतन तुपे यांचा विजय झाल्याने कार्यकर्त्य़ांनी जोरजार जल्लोष केला. कार्यकर्त्यांनी बाईक रॅली काढली. तुपे यांनी आपले वडील खासदार कै. विठ्ठलराव तुपे यांच्या पुतळ्याला हार घालून रॅली काढली व मतदारांचे आभार मानले. सर्व मतदारसंघ राष्ट्रवादीमय झाला.

तुपे यांनी आपल्या यशाचे सर्व श्रेय पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजीत पवार, खासदार सुप्रिया सुळे, आघाडीचे सर्व कार्यकर्ते व नेत्यांना दिले. केवळ 2895 मतांनी पराभव झालेल्या आमदार योगेश टिळेकर यांच्या कार्यकर्त्यांना पराभव जीवाशी लागला. त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांच्या गोटात निराशा दिसून येत होती. विदयमान आमदाराचा पुढील निवडणूकीत पराभव होतो. हे या मतदार संघाचे वैशिष्टय होते. तो इतिहास यावेळी ही खरा ठरला. 

प्रचाराच्या पहिल्या दिवशीच चेतन तुपे यांना या निवडणूकीत जिंकून आणायचेच हा ध्यास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी घेतला होता. माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर हे व कॅंाग्रेसचे सर्व कार्यकर्ते एक दिलाने प्रचार करताना दिसले. तसेच राष्ट्रवादी कॅंाग्रसेच सर्व नगरसेवक, पदाधिकारी हे खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे राहिले. गेल्या निवडणूकीत पक्षातील अंतर्गत वादामुळे तुपे यांना फटका बसला होता. मात्र या निवडणुकीत सर्वांनी एकदिलाने काम केल्यामुळे तुपे यांचा विजय सोपा झाला.  

या मतदारसंघात माळी, मराठा आणि मुसलिम समाजाची मते निर्णायक ठरतात. तिन्ही समाजाची मते आपल्याकडे खेचण्यात तुपे यावेळी यशस्वी ठरल्याचे यानिमित्ताने अधोरेखीत झाले. तुपे यांच्या प्रचारात राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, खासदार डॅा. अमोल कोल्हे आणि माजी उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनी सहभाग घेतला. त्यामुळे पहिल्या दिवसापासूनच तुपे प्रचारात आघाडीवर राहिले.

टिळेकर यांच्या प्रचारासाठी केवळ पालकमंत्री चंद्रकांत पाटील याची सभा झाली. त्या सभेचा फायदा टिळेकर यांना अपेक्षाप्रमाणे न झाल्याचे चित्र पहायला मिळाले. दरम्यान पुणे शहरात एकाही मतदार संघात शिवसेनेला उमेदवारी न दिल्याने शिवसैनिक नाराज होते. त्यामुळे मतदार संघातील तमाम शिवसैनिक यांचा मनापासून पाठींबा टिळेकर यांना मिळाला नाही. तसेच भाजपामधील अंतर्गत गटबाजीचा फटका देखील टिळेकरांना बसल्याची चर्चा या मतदार संघात आहे. तसेच टिळेकर यांच्यावर दाखल झालेल्या गुन्हयाचा काहीसा परिणाम त्यांच्यावर झाला. त्यामुळे त्यांची प्रतिमा डागळली.

तुपे व मनसेचे उमेदवार वसंत मोरे यांनी आपल्या प्रचारात स्थानिक प्रश्नांना महत्व दिले. तसेच आमदार टिळेकरांनी केलेल्या कामांचा पोलखोल केला. त्यामुळे मतदार संघात परिवर्तनाची लाट आली. आता तुपे यांना मतदार राज्यांनी संधी दिली आहे. त्यामुळे मतदार संघात चांगले काम करण्याची जबाबदारी तुपे यांच्यावर आली आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com