शरद पवारांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावरील ८० अक्षरचित्रांचे प्रदर्शन

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त दुर्मिळ अशा अक्षर मुद्रणातून रेखाटलेल्या त्यांच्या ८० अक्षरचित्रांचे प्रदर्शन देशात प्रथमच पिंपरी-चिंचवडमध्ये भरत आहे.
शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अक्षरचित्रांचे प्रदर्शन
शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अक्षरचित्रांचे प्रदर्शन

पिंपरीः राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त दुर्मिळ अशा अक्षर मुद्रणातून रेखाटलेल्या त्यांच्या ८० अक्षरचित्रांचे प्रदर्शन देशात प्रथमच पिंपरी-चिंचवडमध्ये भरत आहे. 

श्रूती गावडे या शहरातीलच  रिक्षाचालकाच्या चोवीस वर्षीय रेखाचित्रकार मुलीने ही रेखाचित्रे रेखाटली आहेत. शरद पवारांना लावल्या जाणाऱ्या ८० विशेषणनामांतून त्यांची ही ८० अक्षरचित्रे काढली गेली आहेत.

श्रृतीने यापूर्वी बिग बी अमिताभ बच्चन यांची ७७ अक्षरचित्रे त्यांच्या ७७ व्या वाढदिवशी तयार करून त्यांचे प्रदर्शन भरविले होते. मात्र, आपल्या कलेसाठी तिने प्रथमच  एका राजकीय नेत्याची निवड केली आहे. शरद पवारसाहेब हे लोकनेते असून त्यांचा प्रत्येक पैलू अभ्यासण्याजोगा आहे,म्हणून त्यांची निवड केली. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्याप्रती आदराची भावना म्हणून ही रेखाचित्रे काढली, असे श्रूतीने बुधवारी सरकारनामाला सांगितले. 

घरात कलेचा कसलाही वारसा नसलेली श्रूती ही मात्र अष्टपैलू आहे. ती उत्तम रांगोळी काढते. छत्रपती शिवरायांची चाळीस फूटांची रांगोळी तिने काढलेली आहे. अस्तंगत होत असलेल्या मोडी लिपीचे संवर्धन करून तिचा प्रचार व प्रसाराचे कामही ती आपल्या परीने करीत आहेत.मोडी लिपीची आवड लहानग्यांत निर्माण होण्यासाठी तिने त्यांच्या आवडीच्या चकल्या या मोडी लिपीत बनवल्या होत्या.

चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृहातील कलादालनात १५ ते १७ डिसेंबर पर्यंत हे रेखाचित्र प्रदर्शन सर्वांना पाहता येणार आहे.कलाविषयक उपक्रम राबविण्याचे काम शहरात करणारी अंशुल क्रिएशन ही संस्स्था व तिचे प्रमुख विजय जगताप यांनी या प्रदर्शनाच्या आयोजनासाठी पुढाकार घेतला आहे. राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक व लिगल सेलचे अध्यक्ष ॲड. गोरक्ष लोखंडे यांचे सहकार्य त्यासाठी लाभले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोंदीवरील कात्रणांच्या प्रदर्शनासाठी हे कलादालन बूक झाल्याने शरद पवारांच्या वाढदिवसापासून त्यांच्या रेखाचित्राचे प्रदर्शन श्रूतीला भरवता आले नाही. तिला तीन दिवसानंतरची तीन दिवसांची तारीख त्यासाठी मिळाली. शरद पवारांपुढे जी विशेषणे आदराने व अभिमानाने लावली जातात अशा ८० नावांतून ही  रेखाचित्रे काढण्यात आली आहेत. 

कल्पनीय, अफाट, अद्भुत, अजिंक्य, अजातशत्रू, करारी, कर्तृत्ववान, कष्टाळू, कर्मठ, कर्दनकाळ, खतरनाक, खमका, खणखणीत, खेळाडू, खेळीया, गतिमान, गहिवर, घमासान, घातक, चतुरस्त्र, चौफेर, चमत्कारिक, चळवळ, चिरतरुण, छावा, छातीठोक, छत्र, छबिदार, जिवलग, जिवंत, जिगरबाज, जिद्द, जेता, झंजावात, टोकदार, टस्सल, ठाणेदार, ठसनी, डोंगर, डरकाळी, ढाण्यावाघ, तलवार, तल्लख,तरुण, तगडा, तफडदार, थलैवा, दैदिपयमान दृष्टा, धडाकेबाज, धाक, धमक, ध्यैर्यवान, निर्णायक, निरंकार, पैलवान, पटाईत, प्रबळ, प्रेमळ पिता, फुत्कार, बेधडक, बिनधास्त, बेफिकीर, बुलंद, बाहूबली, भावूक, भारावलेला, भला, मजबूत, मेहनती, माणूस, मशाल, योगी, यत्न, यार, यातना, रांगडा, राही, राजामनाचा, ललकार, लक्षभेदी, वस्ताद, विचार, विज्ञानवादी, वैश्विक विद्यापीठ, शिकारी, शांत, शाही, संयमी, सहिष्णु, सत्कार, सदाचारी, हरफनमौला, हक्काचा, क्षत्रिय आणि ज्ञानी ही ती विशेषणे आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com