चीन विरूद्धच्या लढाईतला नायक लालफितीपुढे हतबल 

चीन विरूद्धच्या लढाईतला नायक लालफितीपुढे हतबल 

मुंबई : सन 1962 मध्ये झालेल्या भारत-चीन युद्धात विशेष कामगिरी बजावणारे सेवानिवृत्त सैनिक चंद्रशेखर मल्लीकार्जुन जंगम (वय 99 वर्ष) हे गेल्या 49 वर्षापासून न्यायासाठी लढत आहेत. तत्कालिन शासकीय धोरणानुसार जमिनीचे मुल्यांकन भरूनही केवळ लालफितीच्या भोंगळ कारभारामुळे जमिनीचा ताबा मिळत नसल्याने अखेर त्यांनी लोकायुक्तांकडे धाव घेतली आहे. चीन विरुध्दच्या लढाईतला नायक लालफितीच्या कारभारापुढे हतबल झाला आहे. 

सातारा जिल्ह्यातील रहिमतपूर येथील चंद्रशेखर मल्लीकार्जुन जंगम यांनी चीन विरूध्दच्या लढाईत सहभाग घेतला होता. त्या लढाईत त्यांनी विशेष कामगिरीही बजावली होती. जंगम हे भारतीय सैन्यदलातून सन 1971 मध्ये सेवानिवृत्त झाले. तत्कालिन शासकीय धोरणानुसार सेवानिवृत्त सैनिकांना योग्य मोबदल्यात जमिनी देण्यात येत होत्या. त्यानुसार 26 नोव्हेंबर 1964 रोजी साताऱ्याचे तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांकडे जंगम यांनी जमीन मिळण्याबाबत अर्ज केला होता. त्या अर्जाच्या अनुषंगाने तत्कालिन जिल्हाधिकाऱ्यांनी क्रमांक सी. टी. एस. 22.7 या आदेशाच्या संदर्भाने तत्कालिन नगरभूमापन नगररचनाकार सातारा यांच्याकडून मुल्यांकन करून घेत रविवार पेठ, 166 / अ,1 या शासकिय जमिनीच्या कब्जाहक्काची रक्कम भरण्याबाबत 20 सप्टेंबर 1968 रोजी जंगम यांना पत्राद्वारे कळवले. त्याप्रमाणे 11 आँक्‍टोबर 1968 रोजी शासकिय चलन क्रमांक 27 ने शासकिय कोषागारात जंगम यांनी मान्य मंजुर प्लॉंटची रक्कम रूपये3647 रूपये भरली. त्यानंतर नगरभूमापन अधिकारी सातारा यांनी जंगम यांनी शासकिय मुल्यांकनाचे चलन भरले असून सदर जागा जंगम यांना मंजूर झाल्याचे पत्र पाठवून तत्कालिन जिल्हाधिकाऱ्यांना कळवले. 
त्यानंतर जंगम यांना मान्य मंजूर केलेल्या भूखंड नियमबाह्य पध्दतीने फाळणी प्रक्रीया न करता सीएसटी.2207 / ए या जागेपैकी 1525 चौ. फु एवढी जागा भागीरथीबाई रघूनाथ बल्लाळ यांना दिली. बल्लाळ यांना जमीन देण्याची प्रक्रीया नियमबाह्य केली असून सतत पाठपुरावा करूनही वर्षाचा कालावधी उलटून गेला तरीही मान्य मंजूर जागेचा ताबा मिळाला नसल्याने जंगम यांच्या मुलाने राज्याच्या लोकायुक्तांकडे तक्रार केली आहे. 


........................
वडिल न्यायासाठी आज रोजी शंभराव्या वर्षीही लढतच आहेत. मात्र तरीही न्याय मिळत नसल्याने आम्ही हतबल झालो आहोत. आम्ही आमच्या न्याय हक्कासाठी काय करायला हवे म्हणजे आम्हाला न्याय मिळेल ? संरक्षण मंत्रालय, पंतप्रधान कार्यालय, मुख्यमंत्री कार्यालय यांच्याकडे वारंवार अर्ज करूनही अद्याप न्याय मिळत नसल्याने लोकायुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे. 
धंनजय चंद्रशेखर जंगम 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com