Ex Mp Sadashivrao Thakre About Sharad Pawer | Sarkarnama

विरोधी पक्षाच्या खासदाराचेही आत्मियतेने काम करणारा नेता : सदाशिवराव ठाकरे 

सदाशिवराव ठाकरे, माजी खासदार 
बुधवार, 12 डिसेंबर 2018

शेतकरी, सर्वसामान्य यांची प्रश्‍नाची जाण असणार एकमेव नेता आज देशात आहे. तो म्हणजे शरद पवार त्यामुळे महाराष्ट्राचा हा माणूस देशाचा पंतप्रधान व्हावा अशी इच्छा आहे. त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा - सदाशिवराव ठाकरे

ध्यंतरी शरद पवार साहेबांची प्रकृती ठिक नव्हती. ते घरी आराम करीत होते. त्यावेळी त्यांची भेट घेण्यासाठी मी त्यांच्या घरी गेलो. त्यांच्या कक्षात प्रवेश केल्यानंतर त्यांनी काय सदाशिवराव? कसे आहात? असे विचारले. मी त्यांना प्रकृती विषयी विचारण्यापूर्वीच त्यांनी माझ्या प्रकृतीची विचारपूस केली. काळजी घेत चला, प्रवास दगदग करु नका असा सल्ला दिला. जवळच्यांची काळजी घेणारा असा हा असामान्य नेता आहे. 

वर्धा येथील कार्यक्रमाला पवार साहेब आले होते. त्यावेळी मी माझ्या एका छोट्या कामासाठी त्यांची भेट घेतली. माझ्या कामाबद्दल त्यांच्या कानावर गोष्ट घातली व निवेदन तुमच्या पी. ए.कडे देतो, असे सांगितले. परंतू, त्यांनी मला थांबविले. ते निवेदन पवार साहेबांनी स्वतः मागून घेतले. मी स्वतः त्यात लक्ष घालतो, असे म्हणाले. काही दिवसांनी माझे कामही झाले. यावेळी त्यांच्यासोबत विरोधी पक्षाचे खासदार बसलेले होते. भेटीनंतर बाहेर आल्यानंतर त्या विरोधी पक्षाच्या खासदारांनी मला थांबविले. आम्ही विरोधात आहोत, मात्र, ज्या पद्धतीने पवार साहेब आमचे काम करतात तेवढी कामे आमचे नेते करीत नसल्याचे ते खासदार बोलले, यावरुनच पवार साहेबांची राजकीय उंची लक्षात येते. 

महाराष्ट्राचा माणूस पंतप्रधान व्हावा
शेतकरी, सर्वसामान्य यांची प्रश्‍नाची जाण असणार एकमेव नेता आज देशात आहे. तो म्हणजे शरद पवार त्यामुळे महाराष्ट्राचा हा माणूस देशाचा पंतप्रधान व्हावा अशी इच्छा आहे. त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा 
(शब्दांकन : चेतन देशमुख)

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख