माजी खासदार महाडिकांकडून जेवणाची पॅकेट्‌स; स्वतःसह कुटुंब कामात 

कोरोनामुळे देशभर लॉकडाऊन असल्याने रोजगार संपलेल्या आणि शहर परिसरात अडकून पडलेल्या सुमारे 200 लोकांसाठी दररोज जेवणाची पॅकेट्‌स देण्याचा उपक्रम भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी खासदार धनंजय महाडिक यांनी सुरू केला आहे.
EX Mp Dhananjay Mahadik Making Food Packets for Needy
EX Mp Dhananjay Mahadik Making Food Packets for Needy

कोल्हापूर : कोरोनामुळे देशभर लॉकडाऊन असल्याने रोजगार संपलेल्या आणि शहर परिसरात अडकून पडलेल्या सुमारे 200 लोकांसाठी दररोज जेवणाची पॅकेट्‌स देण्याचा उपक्रम भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी खासदार धनंजय महाडिक यांनी सुरू केला आहे. आचारी नाही, लॉकडाऊनमुळे कर्मचारीही घरी नाहीत अशा परिस्थितीत स्वतः, पत्नी सौ. अरूंधती, आई श्रीमती मंगल आणि बहिणीच्या मदतीने त्यांनी हे काम सुरू केले आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 14 एप्रिलपर्यंत देशभर लॉकडाऊन जाहीर केले आहे. हा निर्णय रात्री आठ वाजता जाहीर केला आणि त्याची अंमलबजावणी त्याच रात्री 12 वाजता सुरू करण्यात आली. त्यामुळे अनेक बाहेरगावी जाणारे चाकरमाने शहर आणि परिसरातच अडकून पडले आहेत. अनेकांचा रोजगार संपल्याने त्यांच्या खाण्यापिण्याचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. अशा लोकांची गैरसोय टाळण्यासाठी श्री. महाडिक यांच्याकडून पुढाकार घेत रोज 200 लोकांना जेवणाचे पॅकेट्‌स त्यांच्याकडून पुरवले जात आहे.

महापुराच्या काळातही श्री. महाडिक आणि कुटुंबियांनी रोज सुमारे तीन ते चार हजार लोकांना पुरेल इतकी अन्नाची पॅकेट्‌स पुराचा सर्वाधिक फटका बसलेल्या शिरोळ, हातकणंगले तालुक्‍याला पुरवठा केली होती. सामाजिक बांधिलकीचा हाच धागा पकडून कोरोनाच्या संकटातही अडचणीत सापडलेल्या लोकांसाठी ते पुन्हा धावून आले आहेत. लॉकडाऊनमुळे जेवण करण्यासाठी आचारी नाही, इतर चपात्या करण्यासाठी महिला मिळत नाहीत, अशा परिस्थिती त्यांच्यासह पत्नी सौ. अरूंधती, आई श्रीमती मंगल, एक बहिण व मुलगा पृथ्वीराज यांच्या मदतीने त्यांनी हे काम सुरू केले आहे. स्वतः श्री. महाडिक व त्यांच्या पत्नी सौ. अरूंधती जेवणाचे पॅकेट्‌स तयार करून ते पोहचवण्याचा प्रयत्न करतात.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com