एक भाऊसाहेब शिवसेनेत जाताच दुसरे भाऊसाहेब भाजपमध्ये! खरेच युतीचे काय होणार?

एक भाऊसाहेब शिवसेनेत जाताच दुसरे भाऊसाहेब भाजपमध्ये! खरेच युतीचे काय होणार?

श्रीरामपूर ः माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचा आज सांयकाळी मुंबईतील भाजपाच्या प्रदेश कार्यालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपाचे प्रदेशाध्यक्ष महसुलमंत्री चंद्रकांत पाटील व प्रदेश सरचिटणीस आमदार सुरेश हळवणकर यांच्या उपस्थित भारतीय जनता पार्टीत पुनर्प्रवेश झाला.

गेल्या विधानसभा निवडणुकीत वाकचौरे यांनी श्रीरामपूर मतदासंघातुन भाजपाकडुन उमेदवारी केली होती. त्यावेळी आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी त्यांचा साडेचार हजाराहुन अधिक मतांनी पराभव केला होता. वाकचौरे यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाले होती.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिर्डी मतदारसंघातुन वाकचौरे यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी केली. त्यात ते पराभुत झाले. बंडखोरीमुळे पक्षाने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली होती. त्यांनतर आज त्यांना पुन्हा पक्षात सामावुन घेण्यात आले.

आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी शनिवारी (ता 7) मातोश्रीवर शिवसेना कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांच्या उपस्थतीत हाती शिवबंधन बांधुन शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. ही राजकीय घडामोड ताजी असताना आज सांयकाळी माजी खासदार वाकचौरे यांना पुन्हा भाजपात प्रवेश झाला. त्यामुळे आता सर्वाचे लक्ष युतीकडे वेधले आहे. युती होणार का आणि य़ुती झाली तर आमदार कांबळे यांना संधी मिळणार की माजी खासदार वाकचौरे यांना याबाबत उत्सुकता आहे.

याबाबत वाकचौरे यांच्या संपर्क साधला असता, श्रीरामपूर मतदार संघातील राजकीय परिस्थिती पहाता जनतेसाठी भाजपाकडुन उमेदवारी करण्यास आपण इच्छुक आहोत. युती बाबत स्पष्टपणे सांगता य़ेत नाही. मात्र पक्षातील वरिष्ठ याबाबत लवकरच बैठक घेवुन निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com