दिवाळीआधी मनसेत होणार "घरवापसी'

दिवाळीआधी मनसेत होणार "घरवापसी'

पुणे : पुणे महापालिका निवडणुकीच्या काळात किंवा त्यापूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सोडून गेलेले पक्षाचे काही पदाधिकारी येत्या काही दिवसात पुन्हा पक्षात प्रवेश करणार आहेत. यामध्ये माजी पदाधिकाऱ्यांबरोरच सुमारे तीन ते चार नगरसेवकांचा समावेश आहे. 

मनसैनिंकांच्या या घरवापसीला राज ठाकरे ठाकरे यांनी सुरवातीला अनुमती नव्हती. मात्र पक्ष संघटनेचे काम करणाऱ्या पुण्यातील पदाधिकाऱ्यांनी आग्रह धरल्यानंतर ठाकरे यांनी परवानगी दिल्याचे पक्षातील सूत्रांनी दिली. गेल्या दोन वर्षांत विशेषत: महापालिका निवडणुकीच्या दरम्यान अनेक कार्यकर्ते भारतीय जनता पक्ष व शिवसेनेसह इतर पक्षात गेले होते. यात काही नगरसेवकांचाही समावेश होता. ऐनवेळी पक्ष सोडून गेलेल्यांना पुन्हा पक्षात घेऊ नये, अशी ठाकरे यांची भूमिका होती.

मात्र यातील अनेक कार्यकर्ते पक्षाच्या स्थापनेपासून ठाकरे यांच्यावर निष्ठा ठेवणारे होते. काही कारणाने पक्षात मतभेद झाल्याने यांनी चुकीची वाट धरली होती. त्यांना पक्षात घेतल्यास संघटना बांधणीला चालना मिळेल, अशी भूमिका मांडत ठाकरे यांचे मन वळविण्यात आल्याचे या सूत्रांनी सांगितले. 

पक्षाची संघटना बांधणी ठाकरे यांनी मनावर घेतली असून गेल्या महिन्यात पुण्यात दोन दिवस थांबून शाखाध्यक्ष व मतदारसंघनिहाय उपाध्यक्षांच्या पदासाठी मुलाखती घेतल्या होत्या. या प्रक्रियेचा पुढचा टप्पा येत्या पंधरा दिवसात पूर्ण करण्यात येणार असून दिवाळीपूर्वी नव्या पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका जाहीर करण्यात येतील, असे या सूत्रांनी सांगितले. पदाधिकाऱ्यांची घरवापसी दोन टप्प्यांत होणार आहे. पहिल्या टप्प्यात दसऱ्याच्या आधी काही कार्यकर्ते प्रवेश करणार आहेत.

दुसऱ्या टप्प्यात दसऱ्यानंतर व दिवाळीपूर्वी काही प्रवेश होणार आहेत. दिवाळीपूर्वी पक्षाचा शहर पातळीवरील मेळावा घेण्यात येणार आहे. या दरम्यान आणखी काही प्रवेश होणार असल्याचे या सूत्रांनी सांगितले. पक्ष सोडून गेल्यानंतर कार्यकर्त्यांनी इतर पक्षातील बरा-वाईट अनुभव गाठीशी बांधला असून यापुढे पक्ष सोडताना हजारदा विचार करावा, असा सल्ला घरवापसी करणाऱ्या काही कार्यकर्त्यांनी दिला आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com