ex mla vaijanath aakat passaway | Sarkarnama

माजी आमदार वैजनाथ आकात यांचे निधन 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 25 जुलै 2018

परतूर ः माजी आमदार वैजनाथ यादवराव आकात यांचे बुधवारी (ता. 25) वयाच्या 89 व्या वर्षी निधन झाले. जालना येथील खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपाचर सुरू होते. दुपारी सव्वाबाराच्या सुमारास त्यांची प्राणज्याते मालवली. उद्या, गुरूवारी सकाळी दहा वाजता त्यांच्या पार्थिवावर परतूरच्या लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयाच्या प्रांगणात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 

तत्पुर्वी त्यांचे पार्थिव आज सायंकाळी सात वाजेजपासून अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. वैजनाथ आकात यांच्या पश्‍चात पत्नी, मुलगा, तीन मुली, पुतणे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. परतुर-मंठा विधानसभा मतदारसंघातून ते 1985 ते 1995 असे सलग दोन वेळा निवडूण आले होते. पहिल्यांदा शरद पवार यांच्या पुरोगामी लोकशाही आघाडीकडून तर 1990 मध्ये कॉंग्रेस पक्षाकडून ते विधानसभेवर निवडूण गेले. 

सातोना येथील विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन म्हणून त्यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीला सुरूवात केली होती. पंचायत समिती सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती ते आमदार असा त्यांचा राजकीय प्रवास. दरम्यान परतुर तालुक्‍यात प्रथमच बागेश्‍वरी साखर कारखाना, परतूर पीपल्स बॅंक, मराठावाडा सर्वोदय शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून त्यांनी सहकार व शैक्षणिक क्षेत्रात देखील भरीव कार्य केले. 

भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांचे ते व्याही होत.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख