ex mla sanjay band no more | Sarkarnama

शिवसेनेचे अमरावती जिल्हाप्रमुख संजय बंड यांचे निधन  

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 14 डिसेंबर 2018

त्यांना छातीचा त्रास जाणवत होता.

अमरावती: शिवसेनेचे जिल्हाप्रमुख, माजी आमदार संजय बंड (54) यांचे हृदयविकाराच्या धक्‍क्‍याने निधन झाले. संजय बंड सलग तीनदा विधानसभेवर निवडून गेले होते. 

गत तीन दिवसांपासून त्यांना छातीचा त्रास जाणवत होता. त्यामुळे घराशेजारील डॉ. प्रफुल्ल कडू यांच्या रुग्णालयात ते उपचार घेत होते. गुरुवारी देखील ते तपासणी करण्याकरीता पायीच रुग्णालयात गेले होते. मात्र तिथेच अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. संजय बंड यांनी अमरावती जिल्ह्यात शिवसेनेच्या वाढीसाठी भरपूर मेहनत घेतली आहे. एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून त्यांची ख्याती होती. शुक्रवारी (ता.14) दुपारी रूख्मिणीनगर, विवेकानंद कॉलनी येथील त्याच्या निवासस्थानाहून त्यांची अंत्ययात्रा निघेल.   

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख