अश्रू पुसत साहेबराव दरेकर म्हणाले, शिकार वाघाने करायची अन खायची गिधाडाने !

भाजपकडून उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या माजी आमदार साहेबराव दरेकर यांनी दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली.
Darekar crying
Darekar crying

बीड : आता पैशाचे राजकारण झाले आहे. आपण श्रेष्ठींना काय देतो यावर किंमत ठरते. मी 40 वर्षे जनतेची सेवा केली असे म्हणताच माजी आमदार साहेबराव दरेकर यांना अश्रू अनावर झाले. पण, डोळे पुसत स्वतःला सावरत 'शिकार वाघाने करायची अन गिधाडाने खायची' अशी डरकाळीही त्यांनी फोडली.

आष्टी येथील माजी आमदार साहेबराव दरेकर भाजपकडून इच्छुक होते. उमेदवारी टाळल्यानंतर त्यांनी दोन दिवसांपूर्वी शरद पवार यांची भेट घेऊन आज कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला.

 कारखाने, सूतगिरण्या बंद पडण्याचे पाप यांनी केले, कुकडी - सिनाचे पाणी मेहकरित आणता आले नाही असा आरोप त्यांनी नाव न घेता भीमराव धोंडे यांच्यावर केला. 

लोकप्रतिनिधींनी ताकद लावली असती तर मतदार संघाचे कल्याण झाले असते, फुकट रस्ते महर्षी म्हणून घेऊ नका. आता गाढवाला राजा म्हणण्याचे दिवस आले आहेत असे म्हणत आता कोणाला गाढायचे आणि कोणाला उचलायचे हे मी लवकरच सांगतो असेही साहेबराव दरेकर म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com