ex mla sadashiv patil will join ncp | Sarkarnama

खानापूरचे माजी आमदार राष्ट्रवादीत प्रवेश करणार 

संपत मोरे
बुधवार, 4 डिसेंबर 2019

सदाशिवराव पाटील  हे अधिकृतरित्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. 

पुणे: सांगली जिल्ह्यातील खानापूर मतदारसंघाचे माजी आमदार सदाशिवराव पाटील लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर त्यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेऊन राष्ट्रवादीत येण्याची इच्छा व्यक्त केली होती. 

सदाशिवराव पाटील 2004, 2009 मध्ये आमदार म्हणून निवडून आले होते. यावेळी ते अपक्ष म्हणून रिंगणात होते. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी मदत केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष ऍड बाबासाहेब मुळीक यांनी त्यांच्या प्रचाराची धुरा सांभाळली होती. काँग्रेसने सुद्धा त्यांना सहकार्य केले.

विधानसभा निवडणुकीच्या अगोदर ते राष्ट्रवादीच्या संपर्कात होते मात्र त्यांचा प्रवेश होऊ शकला नाही मग राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांना विधानसभा निवडणुकीत पाठिंबा दिला. काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीने या मतदारसंघात उमेदवार दिला नव्हता. निवडणुकीत पाटील यांचा पराभव झाला. आता ते अधिकृतरित्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख