आमच्या मतावर भाजप सरकार निवडून आले : लक्ष्मण माने

बारामतीला भटक्‍या विमुक्‍तांचे महाअधिवेशन घेतले जाणार आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार महामेळाव्यास उपस्थित राहणार आहेत. याच वेळी मीही राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे, असेही श्री माने यांनी सांगितले.
ex mla laxman mane opposes caa
ex mla laxman mane opposes caa

कोल्हापूर : आमच्या मतावर भाजप सरकार निवडून आले. सत्ता स्थापन केली. त्यानंतर आमचे नागरिकत्व नाकारत आहेत. आम्हाला संविधानाने नागरिकत्व बहाल केले आहे. ते काढून घेण्याचा अधिकार सत्ताधारी भाजपला नाही, अशी टीका माजी आमदार लक्ष्मण माने यांनी पत्रकार परिषदेत केली.

श्री. माने म्हणाले, "एनपीआर, सीएए व एनआरसी या कायद्याद्वारे घटनेने दिलेले अधिकार नाकारले जात आहेत. राज्यात अडीच कोटी भटके-विमुक्त आहेत. त्यापैकी बहुतेक जण 1950 पूर्वीचा जन्म-मृत्यूचा दाखला किंवा स्थावर जंगम मालमत्ताचा पुरावा देऊ शकत नाहीत. असा दाखला किंवा पुरावा नसेल अशा व्यक्‍ती नव्या कायद्यामुळे नागरिक ठरू शकते. त्यांना कॅम्पमध्ये ठेवले जाऊ शकते. त्यामुळे घरेदारे, गाड्या, नोकऱ्या सरकार ताब्यात घेऊन शकेल. याचा सर्वांत मोठा फटका भटक्‍या विमुक्तांना बसणार आहे. आपले नागरिकत्व सिद्ध न करता आलेल्या व्यक्तीला भारताचा नागरिक ठरविले जावू शकते. त्याला विरोध केल्यास प्रशासन पोलिस कारवाई होऊ शकते. या पार्श्‍वभूमीवर भटके-विमुक्तांनी एकत्र येऊन या कायद्याला विरोध करणे अपेक्षित आहे. याबाबतचे जिल्हावार दौरे करून जनजागृती केली जात आहे.'' 

ते म्हणाले, "वरील तिन्ही कायदे अल्पसंख्याकांकडे बोट दाखवित असले तरी चार बोटे सर्व समाजाकडे आहेत. ही बाब भटके विमुक्तांनी लक्षात घेणे आवश्‍यक आहे. ही माहिती दौऱ्यात सांगण्यात येत आहे.'' 

बारामतीला भटक्‍या विमुक्‍तांचे महाअधिवेशन घेतले जाणार आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार महामेळाव्यास उपस्थित राहणार आहेत. याच वेळी मीही राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे, असेही श्री माने यांनी सांगितले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com