Ex Mla Dilip Bankar Wishes Sharad Pawar on his Birthday | Sarkarnama

पवार साहेबांनी रात्री बाराला फोन करुन शेतकऱयांसाठी आंदोलन केल्याचे कौतुक केले

दिलीप बनकर , माजी आमदार 
बुधवार, 12 डिसेंबर 2018

शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर शरद पवार अतिशय जिव्हाळ्याने लक्ष घालतात. 2009 मध्ये आमदार असतांना कांदा दर प्रचंड कोसळले. शेतकरी रस्त्यावर उतरले. सत्ताधारी पक्षाचा आमदार असलो तरी मी स्वतः त्यात सहभागी झालो. काही शेतकऱ्यांनी तर रात्री अकराला आंदोलन केले. ही बातमी कळल्यावर पवार साहेबांनी मध्यरात्री बाराला मला फोन करुन प्रश्‍न समजावून घेतला. सकाळ उजाडण्याची वाट न पाहता त्याचवेळी निर्यात शुल्क कपातीचा निर्णय त्यांनी घेतला. 

शरद पवार हे नाव माहित नाही किंवा त्यांच्याविषयी प्रेम नाही असा शेतकरी महाराष्ट्रातच काय देशातही सापडणार नाही. जगभरातल्या शेती व शेतीतील संशोधनाचा, नव्या प्रयोगांचा अभ्यास ते सातत्याने करीत असतात. जगातील नवे प्रयोग आपल्या शेतकऱ्यांना सांगत असतात. पिंपळगाव हा द्राक्ष, कांदा, टोमॅटो व भाजीपाल्याच्या उत्पादनात सातत्याने प्रयोग करणारा परिसर आहे. त्यामुळे अनेकदा पवार साहेब येथे आवर्जुन येतात. 

2009 मध्ये राज्यात अन्‌ केंद्रात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आघाडीचे सरकार होते. पिंपळगावला कांदा आवक वाढली. बाजारभाव कोसळले. शेतकरी संतप्त झाले. मोठे आंदोलन झाले. मी सत्ताधारी पक्षाचा आमदार असलो तरीही त्यात सहभागी झालो. परिसरात काही शेतकऱ्यांनी तर रात्री अकराला आंदोलन केले. त्या दिवशी रात्री बाराला मला साहेबांचा फोन आला. फोन आल्यावर सुरवातीला थोडा धसकाच वाटला. सत्ताधारी पक्षाचा असुनही आंदोलन केल्याने साहेब रागावतील अशी भिती वाटली. पण फोन घेतला. साहेबांनी त्यांच्या स्वभावानुसार गंभीर आवाजात काय घडले याची माहिती विचारली. प्रश्‍न समजुन घेतला. शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर आक्रमक झाल्याबद्दल कौतुक करीत लगेचच निर्यात शुल्क कमी करण्यात येईल असे सांगीतले. शेतकऱ्यांचीही तीच मागणी होती. त्यामुळे मी खुश झालो. दुसऱ्या दिवशी त्याचे परिणाम दिसून आले. बाजारभाव सुधारले. 

(शब्दांकन - संपत देवगिरे)

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख