EX MLA Bhanudas Murkute swims with flying colors at the age 75 | Sarkarnama

वय वर्षे ७५ पण मुरकुटे तरुणांच्या चपळाईने  पोहले !

सुनील नवले
मंगळवार, 11 सप्टेंबर 2018

तरुणांनी पोहलेच पाहिजे :  भानुसाद मुरकुटे

आजच्या तरुणांना पोहता येत नाहीलहानपणी गावाकडे नदीतगोदावरी नदीतविहिरीत पोहत असल्याने आपण चांगल्या पद्धतीने पोहू शकतोपोहण्याचा व्यायाम सर्वांत उत्तम आहेतरुण पिढी सोशल मीडियात गुंतली आहेतसेच तरुणांनी खेळले पाहिजेत्यांना पोहता आलेच पाहिजे.

श्रीरामपूर (जिनगर) :  आक्रमक  स्वभावाचे म्हणून परिचित असलेले श्रीरामपूरचे माजी आमदार भानुसाद मुरकुटे एेनवेळी काय करतीलते सांगता येत नाहीवयाच्या ७५ वर्षे पुर्ण केलेले मुरकुटे तरुणांना लाजवीलअसा व्यायाम करतात.

 सोमवारी  तर त्यांनी कमालच केलीभोकर येथील बंधाऱ्याचे जलपूजन केल्यानंतर त्यांनी थेट बंधाऱ्यातच उडी घेतलीपाण्याचा मोह न आवरल्याने चक्क पोहण्याचा आनंद घेतलाया त्यांच्या कृतीने उपस्थितांनी तोंडात बोट घातले.

गोदावरी नदीकाठचे कमलापूर (ताश्रीरामपूरहे मुरकुटे यांचे मूळ गावमुरकुटे २१ नोव्हेंबरला वयाची ७५ वर्षे पूर्ण करून ७६ व्या वर्षात पदार्पण करीत आहेतआजही ते रोज दोन तास व्यायाम करतातसकाळी उठून सायकल प्रवास करून बोरावके महाविद्यालयाच्या मैदानावर फिरतातत्यांच्या घरातच व्यायामाचे साहित्य आहेफिरून आल्यावर घरी एक तास व्यायाम करतातअनेक वर्षांपासून त्यांचा हा नित्यक्रम आहे

तालुक्यातील भोकर येथील माणिकदेव येथील बंधाऱ्याचे जलपूजन सोमवारी  सकाळी मुरकुटे यांच्या हस्ते व ज्येष्ठ नेते अण्णासाहेब चाैधरी यांच्या उपस्थितीत झालेअशोक कारखान्याचे अध्यक्ष दिगंबर शिंदेसरपंच दत्तात्रेय आहेर आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते

जलपूजनाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर लगेचच मुरकुटे यांनी कपडे काढलेउपस्थितांना ते काय करतात हे कळण्याच्या आत त्यांनी बंधाऱ्याच्या पाण्यात उडी घेतलीत्यांनी बराच वेळ पोहण्याचा आनंद घेतलाया वयातही ते चांगले पोहू शकतातहे पाहून उपस्थितांनी आश्चर्य व्यक्त केलेत्यांची ही कृती तरुणांना प्रेरणादायी ठरणारी आहे . 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख