पुण्यात राष्ट्रवादीला धक्का : माजी आमदार बापू पठारे भाजपमध्ये

पुण्यात राष्ट्रवादीला धक्का :  माजी आमदार बापू पठारे भाजपमध्ये

पुणे : पुण्यात राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि काॅंग्रेस या दोन्ही पक्षांना एकमागोमाग एक धक्के बसत आहेत. राष्ट्रवादी काॅंग्रेसचे माजी आमदार बापू पठारे यांनी भाजपमध्ये प्रवेशाचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयामुळे वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातील गणिते आमदार जगदिश मुळीक यांच्यासाठी आणखी अनुकूल झाली आहेत.

आमदार मुळीक आणि पठारे हे दोघे एकाच गाडीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासााठी आज रात्री उशिरा मुंबईकडे निघाले. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हा प्रवेश होणार आहे.

पठारे हे 2009 मध्ये राष्ट्रवादीकडून वडगाव शेरीचे पहिल्यांदा आमदार झाले होते. राष्ट्रवादीची सत्ता पुणे महापालिकेत आणण्यात त्यांचा मोठा वाटा होता. ते आधी काॅंग्रेसमध्ये होते. 2007 च्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीत आले. राष्ट्रवादीची पुणे महापालिकेत पहिल्यांदा सत्ता आल्यानंतर त्यांना स्थायी समितीचे अध्यक्षपद देण्यात आले. 2009 मध्ये ते आमदार झाले. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा मुळीक यांच्याकडून पराभव झाला.

खराडी-चंदननगरमध्ये त्यांना मानणारा मोठा मतदारवर्ग आहे. ते 2019 च्या विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून उमेदवार म्हणून इच्छुक होते. मात्र त्यांना उमेदवारी न मिळाल्याने ते नाराज होते. त्यांच्याऐवजी नगरसेवक सुनील टिंगरे यांना पक्षाने उमेदवारी दिली. त्यांच्या प्रचारातही पठारे उतरले होते. मात्र त्यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय अखेरीस घेतला. त्यांच्या पत्नी संजिला पठारे आणि पुतणे महेंद्र पठारे हे राष्ट्रवादीचे पुणे महापालिकेत नगरसेवक आहेत.

पठारे यांचा प्रवेश भाजपसाठी वडगाव शेरीत `मास्टर स्ट्रोक` ठरला आहे.  भाजपची आणखी ताकद वाढली आहे, अशी प्रतिक्रिया मुळीक यांनी दिली.

राष्ट्रवादीकडून सच्च्या कार्यकर्त्यांवर अन्याय झाल्याने हा निर्णय घ्यावा लागल्याचे पठारे यांनी सांगितले. माझे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जुने संबंध आहेत. भाजपमध्ये योग्य सन्मान देण्याचे त्यांनी आश्वासन दिले आहे. माझ्या भागाच्या विकासासाठी भाजप प्रवेशाचा उपयोग होईल, असे त्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com