Ex mla Bapu Pathare BIRTHDAY | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

उन्मेश जोशी यांची ईडीकडून गेल्या पाच तासापासून चौकशी

बापू पठारे : खराडीचे सरपंच ते आमदार

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 19 ऑक्टोबर 2017

माजी आमदार बापू पठारे यांचा आज (ता. 19 ऑक्टोबर) वाढदिवस. खराडीचे सरपंच ते आमदार असा पठारे यांचा राजकीय प्रवास घडला. त्यांचे वडील तुकाराम पठारे, भाऊ पंढरीनाथ आणि ते स्वतः असे तिघेही खराडीचे सरपंच होते. स्वतः पहिलवान असलेले बापू यांचे व्यक्तिमत्वही रांगडे आहे. "जशास तसे' हा त्यांच्या राजकारणाचा बाणा आहे. "अप्पा' म्हणून ते त्यांच्या निकटवर्तीयांत ओळखले जातात. 

खराडीचा समावेश पुणे महापालिकेत झाल्यानंतर पुण्याची आयटीनगरी म्हणून खराडीची ओळख झाली. या विकासाच्या टप्प्यात बापू पठारे यांनी खराडीचा चेहरामोहरा बदलला. या भागात फिरत असताना आपण खरेच पुण्यात फिरतो का, असा प्रश्‍न पहिल्यांदाच भेट देणाऱ्यांना पडतो. इतकी विकासकामे येथे झाली आहेत. पुणे महापालिकेचे नगरसेवक, शहर सुधारणा समितीचे अध्यक्ष, स्थायी समितीचे अध्यक्ष आणि आमदार असा अशी पदे त्यांनी भूषविली. 

तळागाळात असलेला संपर्क हे त्यांच्या राजकारणाचे वैशिष्ट्य. मतदारांच्या सुखदुःखात सहभागी होणारा आणि त्यासाठी सातत्याने पायाला भिंगरी लावत पळापळ करणारा नेता म्हणूनही त्यांना जनतेत मान आहे. तसेच आक्रमक नेता म्हणूनही त्यांची ओळख आहे. राजकीय प्रतिस्पर्ध्यांना निवडणुकीच्या राजकारणात गारद करण्यात ते वाकबगार आहेत. त्यामुळे त्यांनी आपल्या परिसरावर सातत्याने वर्चस्व ठेवले आहे. नुकत्याच झालेल्या पुणे महापालिकेच्या निवडणुकीत सर्वत्र भाजपची लाट असताना त्यांनी आपल्या भागात राष्ट्रवादीचे चारही नगरसेवक निवडून आणले. वडगाव शेरीचे पहिले आमदार म्हणून त्यांनी मोठ्या प्रमाणात निधी मतदारसंघासाठी आणला होता. त्यातून अनेक कामे उभी राहिली. मोदी लाटेत त्यांचा गेल्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाला. परंतु ते आता पुन्हा नव्या जोमाने कामाला लागले आहेत. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख