ex mla babar and mokate are happy with possible alliance with bjp | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

उन्मेश जोशी यांची ईडीकडून गेल्या पाच तासापासून चौकशी

माजी आमदार बाबर आणि मोकाटे यांना सध्या आनंदाच्या उकळ्या

ज्ञानेश सावंत
बुधवार, 26 सप्टेंबर 2018

पुणे : आगामी निवडणुकांसाठी कॉंग्रेस-आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची आघाडी निश्चित मानली जात असतानाच भाजप आणि शिवसेनेतील प्रेमही वाढण्याचे संकेत आहेत. या दोन्ही पक्षांची युती होण्याची शक्‍यता असल्याने पुण्यातील राजकीय चित्र बदलण्याचा अंदाज इच्छुकांना आहे. युतीच्या शक्यतेचा सर्वाधिक आनंद शिवसेनेच्या पुण्यातील दोन्ही शहरप्रमुखांना झाला आहे.

या पक्षाचे माजी आमदार आणि शहरप्रमुख चंद्रकांत मोकाटे आणि महादेव बाबर यांना तर आतापासूनच आनंदाच्या उकळ्या फुटत आहेत. दुसरीकडे, मात्र, भाजपच्या विद्यमान आमदारांच्या पोटात गोळा येण्याची शक्यता आहे.

शिवसेना आणि भाजप युती झाली नाही तर दोन्ही पक्षांचे नुकसान होईल, असे खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वक्तव्य केले. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी तर शिवसेनेला सोबत घेऊन आम्ही दोनशे जागा जिंकू असे विधान केले. यामुळे भाजपसध्या सेनेसाठी पायघड्या घालत असल्याचे चित्र आहे. शिवसेनेने यावर अद्याप अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. या युतीनंतर पुण्यातील राजकीय चित्र बदलण्याची शक्यता आहे.

पुण्यातील विधानसभेच्या आठपैकी चार जागा पदरात पडून घेण्याचा शिवसेनेचा प्रयत्न असला तरी, याआधी जिंकलेले कोथरुड आणि हडपसर या मतदारसंघासाठी शिवसेना ठाम राहील. त्यामुळे आमदार मेधा कुलकर्णी आणि हडपसरचे आमदार योगेश टिळेकरांची डोकेदुखी वाढणार आहे. त्यामुळे युतीसाठी त्याग करावा लागला तर, भाजपला पहिल्याच फेरीत कोथरुड आणि हडपसर सोडावे लागणार आहे.

कोथरुडसह, शिवाजीनगर, हडपसर, वडगावशेरी हे मतदारसंघ ताब्यात घेऊन, कसबा, पर्वती, खडकवासला, कॅन्टोमेंट भाजपला सोडण्याची शिवसेनेची व्यूहरचना आहे. परंतु, आजघडीला आठही मतदारसंघात आपले वर्चस्व असल्याने भाजप शिवसेनेला चार जागा देईल का, याबाबत मात्र, साशंकताच आहे. 

पुण्यात 2004 निवडणुकीपर्यंत सहा विधानसभा मतदारसंघ होते. तेव्हा, दोन्ही पक्षांकडे तीन-तीन जागा होत्या. पुढे 2009 च्या निवडणुकीत आठ मतदारसंघ झाल्याने युतीत कोथरुड, हडपसर, वडगावशेरी आणि कॅन्टोमेंटमध्ये शिवसेनेचे तर, कसबा, पर्वती, शिवाजीनगर, खडकवासल्या भाजपचे उमेदवार होते. 
2014 च्या निवडणुकीत युती तुटल्याने दोन्ही पक्षाने आठही मतदारसंघात आपापले उमेदवार उभे केले. या निवडणुकीत कोथरुड, पर्वती, हडपसर आणि वडगाव शेरीत शिवसेनेच्या उमेदवारांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली आहेत. त्यामुळे हे मतदारसंघ जिंकण्याचा विश्‍वास शिवसेनेतील इच्छुकांना आहे.

कोथरुड पुन्हा ताब्यात घेण्यासाठी मोकाटे तयारीला लागले आहेत. तर, हडपसरमधील भाजपची स्थिती लक्षात घेता आपण निवडून येण्याची आशा बाबरांना आहे. त्यामुळे हे दोघे भलतेच आनंदात आहेत. 

बाबर म्हणाले, ""भाजपसोबत युती करण्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल. मात्र, आम्ही निवडणूक लढणार आहोत आणि ती जिंकून दाखवू. युतीनंतर काय चित्र असेल हे आता सांगणे कठीण आहे. परंतु, हडपसरमधून निवडून येण्याइतपत शिवसेनेची ताकद आहे.'' 
 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख