ex mla anil rathod welcomes fadavnis rally | Sarkarnama

अनिल राठोडांसाठी थांबला मुख्यमंत्र्यांचा रथ  

मुरलीधर कराळे
शुक्रवार, 13 सप्टेंबर 2019

राठोड यांनी मुख्यमंत्र्यांना पुष्पहार घालून व छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतीमा भेट देऊन जोरदार स्वागत केले.

नगर : नगर शहरात भाजपची महाजनादेश यात्रा आल्यानंतर ठिकठिकाणी भव्यदिव्य स्वागत झाले, मात्र मुख्यमंत्री असलेला रथ कुठे थांबला नाही. परंतु कापडबाजारात शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड हे स्वागताला थांबले असता हा रथ थांबून राठोड यांना मुख्यमंत्र्यांनी रथावर घेतले. राठोड यांनी मुख्यमंत्र्यांना पुष्पहार घालून व छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतीमा भेट देऊन जोरदार स्वागत केले.

राज्य पातळीवर भाजप व शिवसेना यांच्यात युतीबाबत बोलणी सुरू आहे. युती होईल की नाही, याबाबत दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते संभ्रमात आहेत. नगरची विधानसभेची जागा युतीमध्ये शिवसेनेला असते. ती भाजपला मिळावी, यासाठी माजी मंत्री दिलीप गांधी प्रयत्न करीत आहेत. अर्थातच ते विधानसभेसाठी इच्छुक आहेत. असे असताना ही जागा शिवसेनाच लढवेल, यावर शिवसेनेचे नेते ठाम आहेत. या पार्श्वभूमीवर आज राठोड यांच्यासाठी थांबविलेला रथ आणि मुख्यमंत्र्यांचे राठोड यांनी केलेले जंगी स्वागत या प्रसंगाने दोघांची मैत्री अतूट असल्याचे दाखवून दिले.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख