ex minister vasantrao dhotre no more | Sarkarnama

बोरगाव मंजूचे माजी आमदार वसंतराव धोत्रे यांचे निधन 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 10 ऑगस्ट 2018

मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या मंत्रिमंडळातील सहकार राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्यातील ज्येष्ठ सहकार नेते वसंतराव रामराव धोत्रे यांचे शुक्रवारी (ता. 10) निधन झाले. ते 81 वर्षांचे होते. 

अकोला : मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या मंत्रिमंडळातील सहकार राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्यातील ज्येष्ठ सहकार नेते वसंतराव रामराव धोत्रे यांचे शुक्रवारी (ता. 10) निधन झाले. ते 81 वर्षांचे होते. 

कॉंग्रेसचे ज्येष्ठे व सहकार क्षेत्रात वेगळा ठसा उमटविणारे वसंतराव धोत्रे यांचा जन्म अकोला जिल्ह्यातील पळसो बढे येथे 14 फेब्रुवारी 1937 रोजी झाला होता. सहकार व राजकीय क्षेत्रातील अनेक महत्त्वाची पदे त्यांनी भूषविले आहे. गेले काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्यावर येथील ओझोन रुग्णालयात उपचार सुरू असताना शुक्रवारी सायंकाळी 5.30 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांची अंत्ययात्रा शनिवारी दुपारी 2 वाजता त्यांच्या तापडियानगर येथील घरून काढण्यात येईल. त्यांच्या पार्थिवावर उमरी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येईल. त्यांच्या मागे अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिरिष धोत्रे हा मुगला आणि दोन मुली व बराच मोठा आप्त परिवार आहे. 

देशातील पहिल्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संचालक, जिल्हा परिषद सदस्य, आमदार आणि राज्यमंत्री अशी त्यांची राजकीय कारकिर्द आहे. अमरावती येथे मुख्यालय असलेल्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे ते दहा वर्ष अध्यक्ष होते. बोरगाव मंजू (आताचा अकोला पूर्व) विधानसभा मतदारसंघातून ते 1994 मध्ये आमदार झाले होते. 1986 ते 1988 या काळात शंकरराव चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात ते सहकार राज्यमंत्री होते. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख