आमदार सुभाष देशमुखांना शेतकऱ्याचं साकडं; `बेदाणा सौदे सुरू करा'

मागील काही दिवसांपासून बेदाण्याचे सौदे बंद आहेत, ते सैदे सुरु करुन शेतकऱ्यांना दिलासा देण्याबाबतचे गाऱ्हाणे कासेगाव (ता. पंढरपूर) येथील शेतकरी सुरेश देशमुख यांनी आमदार सुभाष देशमुख यांच्याकडे घातले आहे. काही दिवसांपासून सौदे नसल्याने माल जागेवर पडून असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.
ex minister subhash deshmukh communicated with farmers in solapur district
ex minister subhash deshmukh communicated with farmers in solapur district

सोलापूर : मागील काही दिवसांपासून बेदाण्याचे सौदे बंद आहेत, ते सैदे सुरु करुन शेतकऱ्यांना दिलासा देण्याबाबतचे गाऱ्हाणे कासेगाव (ता. पंढरपूर) येथील शेतकरी सुरेश देशमुख यांनी आमदार सुभाष देशमुख यांच्याकडे घातले आहे. काही दिवसांपासून सौदे नसल्याने माल जागेवर पडून असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. 

आमदार देशमुख यांनी आज सकाळी जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांशी कॉल कॉन्फरन्सद्वारे संवाद साधून अडचणी जाणून घेतल्या. यावेळी जवळपास शंभर शेतकऱ्यांनी आपल्या अडचणी सांगून त्या सोडविण्याची मागणी आमदार देशमुख यांच्याकडे केली. त्यामध्ये कासेगाव येथील शेतकऱ्याने बेदाणा सौदे सुरु करण्याची मागणी केली. 

गेल्या एक-दोन दिवसात पाऊस पडल्यामुळे द्राक्षांचे मोठे नुकसान झालेले आहे. दुष्काळ त्यानंतर अवकाळी पाऊस आणि कोरोनामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे. मात्र, त्यांनी खचून न जाता संकटाशी मुकाबला करावा. त्यांना ज्या अडचणी येणार आहेत, त्या सोडविण्यासाठी सोलापूर सोशल फाउंडेशन आणि आपण सदैव कटिबद्ध असल्याचे सांगत आमदार देशमुख यांनी त्या शेतकऱ्यांना धीर दिला. 

बेदाणा प्रक्रियेसाठी लागणारे साहित्य मार्केटमध्ये उपलब्ध नसल्याने अडचण येत आहेत. ज्या ठिकाणी द्राक्षे उपलब्ध आहेत, त्या ठिकाणांहून बाजारात नेताना गाडीची व्यवस्था नाही, गाडीची व्यवस्था झाली तर पोलिस अडवतात त्यामुळे जागेवरच माल पडून असल्याचे मत अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केले. 

मंगळवेढा येथील शेतकरी हरिभाऊ जाधव यांनी ज्या ठिकाणी रिकामे शेड आहेत, त्या ठिकाणची जागा द्राक्ष उत्पादकांना उपलब्ध करून द्यावी. यामध्ये कृषी विभागाने लक्ष घालण्याची मागणी केली. उचेठाण येथील शेतकरी अरविंद पाटील यांनी सध्या गावाकडे 15 ते 18 रुपये किलोने द्राक्ष विकली जात आहे, त्यामध्ये आडत आणि कमिशन द्यावे लागते त्यामुळे किलोला केवळ 12 ते 13 रुपये भाव मिळतो, त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. यासाठी आमदार देशमुख यांनी पुढाकार घेत परराज्यातील एजंटांची बैठक घेत एक हमीभाव ठरवावा. 

या कॉल कॉन्फरन्समध्ये पेनुर येथील धनाजी पुजारी, उळेगाव येथील विलास डांगे, आढीव येथील बाळासाहेब चव्हाण, भाऊसाहेब तरंगे, धर्मराव रामपुरे, धनाजी गरड, अरविंद पाटील, चंद्रकांत चव्हाण यासह शेकडो शेतकऱ्यांनी आपल्या समस्या मांडल्या.

संकटातून संधी निर्माण करा
सध्या सर्वांवर संकट आले आह. या संकटाला मात करण्यासाठी सर्वांनी एकसंध होऊन लढले पाहिजे. या संकटाने खचून न जाता ती एक संधी आहे, असे मानून एकत्र येऊन काम करावे. ज्या शेतकऱ्यांना अडचणी आहेत त्या सोडवण्यासाठी आपण राज्य सरकारकडे पाठपुरावा करू असेही आमदार देशमुख यांनी सांगितले. ज्यांना ज्यांना शक्‍य आहे त्यांनी कोरोना ग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता किंवा पंतप्रधान सहाय्यता निधीला मदत करावी, असे आवाहनही त्यांनी केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com