माजी मंत्री प्रवीण पोटे यांचे `इटली कनेक्शन`

पोलिसांन हैदराबादमध्ये जाऊन केला तपास...
pravin pote italy connection
pravin pote italy connection

अमरावती : राज्यात भाजप-सेनेची सत्ता असताना जिल्ह्याचे माजी पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या नावाने उस्मानाबाद येथील अधिकाऱ्यांवर दडपण आणणारा दुसराच व्यक्ती असून, मूळ सीमकार्डधारक मागील सहा वर्षांपासून इटलीत राहत असल्याची बाब गाडगेनगर पोलिसांच्या तपासातून पुढे आली.

गाडगेनगर पोलिसांचे एक पथक त्या सीमकार्ड धारकाच्या शोधासाठी तीन दिवसांपूर्वीच तेलंगणा राज्यातील हैदराबाद येथे जाऊन आले. प्रवीण पोटेंच्या नावाने जिल्हाधिकारी, तहसीलदार एवढेच नव्हे तर राज्यातील तीन आमदारांना फोन करणारी व्यक्ती हैदराबाद येथील हर्षवर्धन रेड्डी असल्याची बाब पुढे आली होती.

त्यामुळे गाडगेनगर पोलिसांनी हैदराबाद येथील त्याच्या पत्यावर चौकशी केली असता रेड्डी नामक सीमकार्डधारक असला तरी तो सहा वर्षांपासून परदेशात इटली येथे राहत असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी रेड्डी यांच्या वडिलांसोबत संपर्क साधला असता, ही बाब पुढे आल्याचे पोलिस निरीक्षक मनीष ठाकरे यांनी शनिवारी (ता. 14) सांगितले.

सहा वर्षांपूर्वी हर्षवर्धन रेड्डी विमानतळाकडे जात असताना मार्गात त्यांचे पाकीट कुणीतरी चोरले. त्या पाकीटमध्ये हे सीमकार्ड होते. चोरीस गेलेल्या सीमकार्डचा वापर दुसऱ्यांना धमकावण्यासाठी त्या व्यक्तीने केला. पालकमंत्री प्रवीण पोटे बोलत असल्याचे सांगून काही आमदारांसह उस्मानाबादचे जिल्हाधिकारी, तसीलदार यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न त्या व्यक्तीने केला. 31 सप्टेंबर 2019 रोजी श्री. पोटे यांच्या कार्यालयातील श्री. दखने यांच्या तक्रारीवरून गाडगेनगर ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यात पोलिस यापूर्वी औरंगाबाद, नांदेड येथे जाऊन रिकाम्या हाताने परतले होते. रेड्डी यांच्या चोरीस गेलेल्या सीमकार्डचा गैरवापर करणारा अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com