ex minister pankaja munde not celebrate gudi padwa festival due to corona out outbreak | Sarkarnama

जेव्हा भारत जिंकेल, तेव्हाच पंकजाताई गुढी उभारणार!

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 25 मार्च 2020

पुढील २१ दिवस घराबाहेर न पडता स्वतःचे रक्षण करत करोनावर मात करून विजयाची गुढी उभारूया, असेही पंकजा मुंडे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.

बीड : पारंपारिक सण - उत्सव आनंदात साजऱ्या करणाऱ्या भाजप नेत्या व माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी यंदा मात्र घरी गुढी उभारली नाही. जगाची आर्थिक सामाजिक आणि आरोग्याची ही विस्कटलेली घडी नीट होईल तेव्हाच आनंद आणि विजयाची गुढी उभारणार, असा संकल्प त्यांनी केला आहे.

बुधवारी गुढी पाडावा हा मराठी नववर्षाचा उत्सव कोरोना विषाणूच्या सावटाखाली साजरा झाला. दरम्यान, विविध सण - उत्सव साजरा करण्यात पुढाकार घेणाऱ्या आणि स्वत: सहभागी होणाऱ्या पंकजा मुंडे यांनी मात्र यंदा गुढी उभारली नाही.
इटलीसारखा सुंदर देश, अमेरिका एक बलाढ्य राष्ट्र ही करोनासमोर अस्वस्थ लढत आहे. आणि आज गुढी पाडवा, पण मी आणि माझ्या परिवाराने ठरवलं आहे की आज गुढी चढवायची नाही. जेव्हा कोरोना हरेल आणि भारत जिंकेल, तेव्हा गुढी उभारायची नव्या पहाटेची असा संकल्प त्यांनी केला आहे.

पुढील २१ दिवस घराबाहेर न पडता स्वतःचे रक्षण करत करोनावर मात करून विजयाची गुढी उभारूया असेही त्यांनी म्हटले आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख