माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर क्वारंटाईनमधून अखेर बाहेर

लॉकडाऊनच्या काळात औरंगाबादहून आल्याने जयदत्त क्षीरसागर यांच्यावर कारवाई करुन त्यांना क्वारंटाईन करण्याची मागणी विरोधकांनी केली होती.
ex-minister jaydutt kshirsagar freed of quarantine
ex-minister jaydutt kshirsagar freed of quarantine

बीड : विरोधकांच्या मागणीमुळे जयदत्त क्षीरसागर यांना तर होम क्वारंटाईन व्हावेच लागले. पण, त्यांच्यामुळे ते राहत असलेल्या इमारतीतील आमदार संदीप क्षीरसागर व इतर कुटूंबियांनाही क्वारंटाईन व्हावे लागले. अखेर जयदत्त क्षीरसागर क्वारंटाईनमधून बाहेर आले आहेत.

कोरोना विषाणूच्या फैलाव रोखण्यासाठी सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या काळात जयदत्त क्षीरसागर गेल्या आठवड्यात शहरात आले. कोरोनाची भिती व लॉकडाऊनच्या काळात जिल्हा हद्दीत आल्याने त्यांच्यावर कारवाईसह होम क्वारंटाईन करण्याची मागणी विरोधकांनी केली.

दरम्यान, श्री. क्षीरसागर यांनी औरंगाबाद पोलिसांच्या परवानगीने प्रवेश केल्याचे सांगीतले. मात्र, त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले. परंतु, श्री. क्षीरसागर व त्यांचे पुतणे आमदार संदीप क्षीरसागर हे एकाच इमारतीत राहत असल्याने या सर्वांवरच होम क्वारंटाईनची वेळ आली.

दरम्यान, शुक्रवारी जयदत्त क्षीरसागर जिल्हा रुग्णालयात गेले आणि तपासणी करुन घेतली.
त्यानंतर प्रशासनाने त्यांना होम क्वारंटाईनमुक्त केले.

दरम्यान, कोरोना विषाणूच्या फैलावाच्या पार्श्वभूमीवरही क्षीरसागरांतील राजकीय कुरघोड्या समोर आल्या.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com