माजी महापौर संदीप व सचिन कोतकरला जामीन मंजूर

माजी महापौर संदीप व सचिन कोतकरला जामीन मंजूर

नगर: शेवगाव येथील रहिवासी असलेला अशोक लांडे खूनप्रकरणात माजी महापौर संदीप कोतकर व सचिन कोतकर या दोघा बंधुंना मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रणजित मोरे व सुरेंद्र दावडे यांनी आज जामीन मंजूर केला.

केडगाव येथे 2008 मध्ये अशोक लांडे याला अमानूष मारहाण करून त्याचा खून झाला होता. याबाबत कोतवाली पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद झाली होता. या प्रकरणात  साक्षीदार असलेले शंकर राऊत यांनी न्यायालयात खासगी फिर्याद दाखल केली होती. या प्रकरणात 2013 मध्ये तत्कालिन काॅंग्रेसचे नेते भानुदास कोतकर, त्यांचे तीनही मुले संदीप, सचिन व अमोल यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. 

नंतर हा खटला नाशिक न्यायालयात वर्ग करण्यात आला. तेथे न्यायालयात या खटल्याची सुनावणी होऊन सहा जणांना दोषी ठरविण्यात आले. कोतकर पिता पुत्रांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली होती.

दरम्यान, यापूर्वी आरोपी भानुदास कोतकर यांना उच्च न्यायालयाने वैद्यकीय कारणास्तव जामीन मंजूर केला. त्यापाठोपाठ अमोल कोतकर यांनाही जामीन मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर माजी महापौर संदीप आणि सचिन यांनी अ‍ॅड. अभय ओस्तवाल यांच्यामार्फत जामीन अर्ज दाखल केला होता. 

अ‍ॅड. ओस्तवाल यांनी केलेला युक्तीवाद न्यायालयाने ग्राह्य धरून दोघांनाही जामीन मंजूर केला आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com