मुख्यमंत्री कार्यालय, मंत्री आस्थापनेवरील अधिका-यांना सुटेना फौजफाटयांचा मोह!

राज्यात भाजप-शिवसेनेचे सरकार आल्यानंतर खासगी क्षेत्रातील व्यक्‍ती तसेच पक्षांशी संबंधित कार्यकर्त्यांची वर्णी मुख्यमंत्री कार्यालय तसेच मंत्री अस्थापनेवर लावण्यात आली होती.हेच अधिकारी अदयाप सरकारी वाहनांचा उपयोग करीत असल्याचे वाहनांच्या हजेरी बुक नोंदीवरून स्पष्ट झाले आहे
Maharashtra Ex Ministers Special Duty Officers Still Using Official Vehecles
Maharashtra Ex Ministers Special Duty Officers Still Using Official Vehecles

मुंबई : राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केल्यानंतरही मुख्यमंत्री कार्यालय, मंत्री अस्थापनेवरील नेमलेल्या अधिकारी-कर्मचारी हे सरकारी वाहनांचा वापर करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यपाल कार्यालयाकडे राज्यातील प्रशासनाची कमान आल्यानंतरही या अधिकारी-कर्मचारी यांना फौजफाटयाचा मोह सुटत नाही.

राष्ट्रपती राजवट लागू झाल्यांनंतर मुख्यमंत्री कार्यालय, मंत्री अस्थापना अपोआप संपुष्टात येते. त्यामुळे या कार्यालयातील सर्व वस्तू, वाहने, इतर सामुग्री याचा ताबा सामान्य प्रशासन विभागाकडे सोपवावा लागतो. असे असले तरीही हे अधिकारी-कर्मचारी याचा लाभ घेत आहेत.

राज्यात भाजप-शिवसेनेचे सरकार आल्यानंतर खासगी क्षेत्रातील व्यक्‍ती तसेच पक्षांशी संबंधित कार्यकर्त्यांची वर्णी मुख्यमंत्री कार्यालय तसेच मंत्री अस्थापनेवर लावण्यात आली होती. मुख्यमंत्री कार्यालयात विशेष कार्यकारी अधिकारी या पदावर खासगी व्यक्‍तींची नेमणूक करून त्यांच्याकडे दैनदिन कामकाजाचे वाटप केले होते. अशा नियुक्‍त्यांना अवर सचिव, उपसचिव पदाचा दर्जा व वेतन , भत्ते देण्यात आले होते. 

हेच अधिकारी अदयाप सरकारी वाहनांचा उपयोग करीत असल्याचे वाहनांच्या हजेरी बुक नोंदीवरून स्पष्ट झाले आहे.मुख्यमंत्री कार्यालयाप्रमाणे मंत्री अस्थापनेवरील अधिकारी-कर्मचारी हे देखील वाहनांचा वापर करीत आहेत.मंत्री अस्थापनेवर देखील खासगी व्यक्‍ती, पक्षांशी संबंधित पदाधिकारी यांची वर्णी लावण्यात आलेले अधिकारी वाहने वापरत आहेत. तर अदयाप काही मंत्रयांचे खासगी सचिव अदयाप सरकारी वाहनांचा वापर करीत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com