माजी आमदार सदाशिवराव पाटील यांचा १३ फेब्रुवारीला राष्ट्रवादीत प्रवेश

प्रदेश काँग्रेसचे माजी उपाध्यक्ष,माजी आमदार सदाशिवराव पाटील तेरा फेब्रुवारीला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.त्यांच्या प्रवेशामुळे खानापूर मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेसची ताकद वाढणार आहे. त्यांच्या प्रवेशाचा काँग्रेसला मोठा फटका बसणार आहे
Ex Congress MLASadashivrao Patil to Enter NCP
Ex Congress MLASadashivrao Patil to Enter NCP

पुणे : प्रदेश काँग्रेसचे माजी उपाध्यक्ष,माजी आमदार सदाशिवराव पाटील तेरा फेब्रुवारीला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.त्यांच्या प्रवेशामुळे खानापूर मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेसची ताकद वाढणार आहे. त्यांच्या प्रवेशाचा काँग्रेसला मोठा फटका बसणार आहे.

सदाशिवराव पाटील यांचे वडील हणमंतराव पाटील हे शरद पवार यांचे जवळचे सहकारी होते.त्यांनी पवार यांच्या भूमिकेची सातत्याने पाठराखण केली होती.राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर सदाशिवराव पाटील यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केला होता मात्र त्यावेळी राष्ट्रवादीत असलेल्या आमदार अनिल बाबर यांच्याशी त्यांचे न पटल्याने ते कॉंग्रेसमध्ये गेले.नंतर एकदा अपक्ष आणि एकवेळ पक्षाच्या चिन्हावर ते बाबर यांना पराभूत करून विधानसभेत गेले.

काँग्रेस पक्षाने त्यांची प्रदेश उपाध्यक्षपदी निवड केली होती मात्र तिथल्या गटबाजीला कंटाळून त्यांनी पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर ते काँग्रेसपासून दूर होते.नुकतीच झालेली विधानसभा निवडणुक त्यांनी अपक्ष म्हणून लढवली होती या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला तरी मिळालेली मते खूप मोठी होती. विधानसभा निवडणुकीच्या अगोदरपासून सदाशिवराव पाटील शरद पवार यांच्या संपर्कात होते.काही दिवसांपूर्वी त्यांचे सुपूत्र माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी आमदार रोहित पवार यांची भेट घेतली होती.

या सगळ्या गाठीभेटी सुरू असतानाच गेल्या पंधरा दिवसांपूर्वी खटाव तालुक्यात झालेल्या कार्यक्रमात पवार यांच्याशी पाटील यांची पक्षात प्रवेश करण्याबाबत चर्चा झाली.13 (तेरा)फेब्रुवारीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सांगलीला येत आहेत त्या दिवशी पाटील हातावर घड्याळ बांधणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com