फडणवीसांना आज अनुपस्थित राहण्याची न्यायालयाने दिली सूट - ex-cm fadanvis court case | Politics Marathi News - Sarkarnama

फडणवीसांना आज अनुपस्थित राहण्याची न्यायालयाने दिली सूट

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 4 डिसेंबर 2019

सन 2014 च्या विधानसभा निवडणुकीत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्यावरील दाखल फौजदारी प्रकरणांची माहिती लपविली. या प्रकरणी न्यायालयाने आज त्यांना अनुपस्थित राहण्याची सूट दिली. तसा अर्ज त्यांचे वकील उदय डबले यांनी सकाळी जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल केला होता. 

नागपुर :  सन 2014 च्या विधानसभा निवडणुकीत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्यावरील दाखल फौजदारी प्रकरणांची माहिती लपविली. या प्रकरणी न्यायालयाने आज त्यांना अनुपस्थित राहण्याची सूट दिली. तसा अर्ज त्यांचे वकील उदय डबले यांनी सकाळी जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल केला होता. 

पुढील तारखेला चार जानेवारी रोजी त्यांना न्यायालयात उपस्थित राहावे लागणार आहे.

16 डिसेंबरपासून नागपुरात विधानसभेचे हिवाळी अधिवेशन आहे. त्याच्या तयारीसाठी फडणवीस यांना वेळ हवा आहे. त्यामुळे पुढील तारीख अधिवेशन झाल्यानंतरची द्यावी, अशी विनंती देवेंद्र फडणवीस यांच्या वकिलांनी न्यायालयाला केली. न्यायालयाने त्यांची विनंती मान्य करून चार जानेवारी ही तारीख दिलेली आहे, असे याचिकाकर्ते अॅड. सतिष उके यांनी सांगितले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख