शनिदेवाला हात जोडतो.. म्हणत फडणवीस यांनी घेतले चौथऱ्याखालून दर्शन

औरंगाबादहून पुण्याकडे जाताना फडणवीस कुणालाच पूर्वसूचना न देता अचानक रात्री शनिशिंगणापुरला आले. त्यांनी उदासी महाराज मठात सुखशांती करीता नियमीत होणारा अभिषेक करुन स्वयंभू शनिमुर्तीचे चौथ-याखालून दर्शन घेतले
Devendra Fadanavis Took Darshan At Shani Shingnapur
Devendra Fadanavis Took Darshan At Shani Shingnapur

सोनई (नगर) : स्वयंभू शनिमुर्तीच्या या भुमीत मोठी उर्जा असून, दर्शनाने मनाला बरं वाटलं. शनिदेवाला येथूनच हात जोडतो, असे म्हणत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंगणापूर येथे शनिदेवाचे चौथऱ्यावर न जाता खालूनच दर्शन घेतले.

औरंगाबादहून पुण्याकडे जाताना फडणवीस कुणालाच पूर्वसूचना न देता अचानक रात्री शनिशिंगणापुरला आले. त्यांनी उदासी महाराज मठात सुखशांती करीता नियमीत होणारा अभिषेक करुन स्वयंभू शनिमुर्तीचे चौथ-याखालून दर्शन घेतले. शनैश्वर देवस्थान ट्रस्टच्यावतीने कोषाध्यक्ष योगेश बानकर व विश्वस्त अदिनाथ शेटे यांनी त्यांचा शाल, श्रीफळ व प्रसाद देवून सत्कार केला. या वेळी सरपंच बाळासाहेब बानकर, संदीप अट्टल उपस्थित होते.

शनिदेवा हात जोडीतो

फडणवीस यांनी अभिषेक केल्यानंतर त्यांना पुरोहित विशाल कुलकर्णी यांनी शनि मूर्तीला तेल अर्पण करण्यासाठी चौथ-यावर जाण्याची विनंती केली असता, 'शनिदेवा हात जोडीतो' म्हणत त्यांनी इतर भक्तांप्रमाणे चौथ-याखालूनच दर्शन घेतले.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com