दारव्हा येथील तूरविक्री प्रकरण; माजी नगराध्यक्षासह एक व्यक्ती गजाआड 

शेतकऱ्यांकडून कमी किमतीत तूरखरेदी करून कृषी उत्पन्न बाजार समिती व नाफेडला जास्त भावात विक्री केली. या फसवणूक प्रकरणी दारव्हा येथील माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवकासह एका व्यक्तीला गजाआड करण्यात आले
Ex City Chief in Yavatmal Arrested in Fraud
Ex City Chief in Yavatmal Arrested in Fraud

यवतमाळ  : शेतकऱ्यांकडून कमी किमतीत तूरखरेदी करून कृषी उत्पन्न बाजार समिती व नाफेडला जास्त भावात विक्री केली. या फसवणूक प्रकरणी दारव्हा येथील माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवकासह एका व्यक्तीला गजाआड करण्यात आले. ही कारवाई आर्थिक गुन्हे शाखेने बुधवारी (ता.12) केली. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक हरिभाऊ काशिनाथ गुल्हाने (वय 58, रा. तेलीपुरा, दारव्हा,), अमीन बाहोद्दीन मलनस (वय 50, रा. वडगाव गाढवे) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. दारव्हा तालुक्‍यातील शेतकऱ्यांकडून कमी किमतीत तुरीची खरेदी करून कृषी उत्पन्न बाजार समिती व खरेदी-विक्री संघ, दारव्हा येथे नाफेडला जास्त भावात विक्री केली. त्यात शासनाची एक कोटी 41 लाख 82 हजार 863 रुपयांची फसवणूक केली. सहायक निबंधकअंतर्गत जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था तथा प्रभारी मार्केटिंग अधिकारी यांनी 13 ऑक्‍टोबर 2018 रोजी दारव्हा पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविण्यात आला होता. 

या प्रकरणाचा तपास 16 जानेवारीला आर्थिक गुन्हे शाखेकडे आल्यानंतर 22 जानेवारीला धर्मेश देवराव ढोले(रा. नातुवाडी, दारव्हा), महेश ऊर्फ महेश्‍वर पंजाबराव भोयर (रा. शेलोडी) यांना अटक करण्यात आली होती. माजी नगराध्यक्ष गुल्हाने व बमीन मलसन या दोघांनी 2018मध्ये अपर सत्र न्यायालय दारव्हा येथे अटकपूर्व जामिन मिळविण्यासाठी अर्ज सादर केला होता. मात्र, न्यायालयाने दोघांचाही जामीन अर्ज नामंजूर केला होता. तेव्हापासून अटकेची कारवाई होणे बाकी होते. अखेर दोघांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक एम. राजकुमार, अपर पोलिस अधीक्षक नुरूल हसन, पोलिस निरीक्षक प्रदीप शिरस्कर, सहायक पोलिस निरीक्षक राहुलकुमार राऊत यांनी केली. या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

आर्थिक गुन्हे शाखेकडे तूरविक्री प्रकरणाच्या तपास आल्यानंतर अवघ्या काही दिवसांत दोघांना अटक करण्यात आली होती. आज दोघांना अटक करण्यात आली आहे. एक कोटी 41 लाख 82 हजार 863 रुपयांच्या फसवणूक प्रकरणात पुन्हा काही जणांचा समावेश आहे. त्या व्यक्तीही आमच्या रडारवर आहेत -राहुलकुमार राऊत, सहायक पोलिस निरीक्षक,आर्थिक गुन्हे शाखा, यवतमाळ.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com