everyone thinks he is the candidate | Sarkarnama

जो तो म्हणतो 'मीच उमेदवार'

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 21 डिसेंबर 2016

नगर - नेवासे तालुक्‍यातील एका जिल्हा परिषदेच्या गटात एका उद्‌घाटनाचा कार्यक्रम होता. त्यानिमित्ताने एका पक्षातील गटातील सर्व महत्त्वाचे कार्यकर्ते उपस्थित होते. भाषणाला उठल्यानंतर बहुतेक इच्छुक "मीच उमेदवार' असे छातीठोकपणे सांगत होता. त्यात उपस्थितांची चांगलीच करमणूक होत होती. तर श्रेष्ठी मात्र पेचात पडले होते.

भाषणात एका इच्छुकाने "जेष्ठांनी आता थोडे थांबावे. तरुणांना संधी द्यावी, असे सांगत जेष्ठ इच्छुकाचे कान पिळले. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून तयारीत असलेले संबंधित ज्येष्ठ भडकले. "माझीच उमेदवारी जाहीर झाली असून, मीच उमेदवार राहणार,' असे त्यांनी स्वतःच घोषित केले.
ही जुगलबंदी ऐकून तिसरा भाषणासाठी उठला. "निवडणुकीत कधीच कुणाची उमेदवारी फायनल नसते, ज्याची फायनल असते. त्याचीच उमेदवारी शेवटच्या क्षणी कापली जाते. उगाच कोणी स्वप्न बघू नये. आमची तयारी पाण्यात नाही जाणार,'' असे सांगितले.
चौथ्याने तर थेट मुद्द्यालाच हात घालत "आम्ही सुरवातीपासून प्रस्थापीतांच्या विरोधात लढलो असल्याने मीच योग्य उमेदवार आहे. कुणी लुडबूड करू नये.' असे ठणकावून सांगितले.
पाचव्याने  "मी कधी पण कुस्तीला तयार असतो, मला कुणाच्या मदतीची गरज नसते. मला जेव्हा वाटेल, तेव्हा मी निवडणुकीत उतरतो.'' असे सांगून इतरांना सज्जड दमच दिला.
सहावा जरा राजकारणात नवखा होता. त्याने थोडेफार विकासाच्या गप्पा ठोकल्या आणि "विकास कामे करणाराला जनता जवळ करते.'' असे सांगून गप्प बसणे पसंत केले.
या सर्व इच्छुकांच्या जुगलबंदीने श्रेष्ठी पेचात पडले आहेत. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर असे अनेक प्रकार सध्या घडू लागले आहेत. प्रत्येकजण गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहे. या सगळ्यात जनतेची मात्र चांगलीच करमणूक होते आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख