Everyone should respect supreme court's verdict : Sharad People | Sarkarnama

सर्वांनी निकालाचा आदर करावा  : शरद पवार

सरकारनामा
शनिवार, 9 नोव्हेंबर 2019

..

मुंबई : मी  सर्वांनाच आवाहन करतो की देशातील सर्व नागरिकांनी या निर्णयाचा सन्मान करावा. बंधूभावाने स्वागत करावे. देशात शांती निर्माण होण्याची स्थिती या निर्णयानं बनली आहे ती कायम राखावी, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली. 

हा कुणाचा विजय व पराभव आहे हे मानू नये. शांतता व संयम बाळगावा, असेही ते म्हणाले . सर्वोच्च न्यायालयाने अयोध्या प्रकरणात दिलेल्या  निकालावर प्रतिक्रिया देताना श्री. पवार बोलत होते . मंदिर आणि मशिदीत जाऊन प्रार्थना करणे  हा व्यक्तिगत प्रश्न आहे , असेही ते म्हणाले . 

हा निर्णय येण्याअगोदरच शरद पवार यांनी मागील पंधरा दिवसांपासून जो निर्णय येईल त्याचे स्वागत करा. तो मान्य करा आणि जनतेनं शांतता व संयम राखण्याचे सतत आवाहन केले होते.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख