देशात ज्या-ज्यावेळी जनगणना येते तेव्हा मुस्लिम समाजाला भडकावले जाते. : जमाल सिद्दीकी 

कॉंग्रेसकडून दिशाभूल सुरू असून त्याला बळी पडू नये. कोणाचेही नागरिकत्व काढून घेतलेजाणार नाही. परदेशात ज्या अल्पसंख्यांक नागरिकांवर अन्याय होतोय, त्यांना देशात सामावून घेतले जाणार आहे, असे हज समितीचे अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांनी सांगितले.
zamal-siddhiki
zamal-siddhiki

सांगली : "एनआरसी' च्या मुद्दयावरून कॉंग्रेस पक्षाकडून देशाचे तुकडे करण्याचे षडयंत्र रचले जात आहे. यावरून देशभरात सुरू असलेले आंदोलन कॉंग्रेस पुरस्कृतच आहे. कायद्यामुळे मुस्लिमांना कोणताही धोका नसून त्यांनी दक्ष राहावे असे आवाहन महाराष्ट्र हज समितीचे अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 

ते म्हणाले, ""कॉंग्रेस पक्षाकडून राजकारण जीवंत ठेवण्यासाठी मुस्लिम बांधवांना एनआरसी विरोधात भडकावून हिंदूच्यासमोर उभे केले जात आहे. मुस्लिम समाजाला या निमित्ताने बळीचा बकरा बनवले जात आहे. केंद्रात कॉंग्रेसची राजवट असताना मुस्लिम समाजातील तीन-चार पिढ्यांना नागरिकत्व दिले गेले नाही. देशात बेकायदेशीरपणे घुसखोर आजवर आले असताना कॉंग्रेसने त्यांच्यावर कोणतीच कारवाईकेली नाही. घुसखोरांना देशाबाहेर घालवण्याची आज गरज आहे. परंतु कॉंग्रेस पक्ष या मुद्दयावरून राजकारण करत आहे. कॉंग्रेस पुरस्कृत लोकांना एनआरसी विरोधात आंदोलनात पुढे आणले जात आहे. त्यातून देश तोडण्याचे षडयंत्र रचले जात आहे.'' 

ते पुढे म्हणाले, ""देशात ज्या-ज्यावेळी जनगणना येते तेव्हा मुस्लिम समाजाला भडकावले जाते. वास्तविक मुस्लिम समाजाची गणना पूर्ण झाली तरच हज यात्रेसाठी आपल्याला कोटा वाढवून मिळू शकतो. परंतू कॉंग्रेस पक्ष अफवा पसरवून कागदपत्रे दाखवू नका असे आवाहन मुस्लिमांना करत आहे. कॉंग्रेस पक्षाकडे मुस्लिम मतदार अधिक आहेत. त्यामुळे त्यांच्या मतासाठी राजकारण केले जाते. 

भाजपने मुस्लिम समाजासाठी अनेक योजना आणल्या आहेत. परंतू त्या तुलनेत भाजपला मुस्लिम समाजाचे मतदान मिळत नाही. मुस्लिम समाजाने एनआरसी बाबत जागृत होण्याची गरज आहे. त्यांनी घाबरून जाण्याची गरज नाही. त्यांना न्याय देणारा हा कायदा आहे. कॉंग्रेसकडून दिशाभूल सुरू असून त्याला बळी पडू नये. कोणाचेही नागरिकत्व काढून घेतले जाणार नाही. परदेशात ज्या अल्पसंख्यांक नागरिकांवर अन्याय होतोय, त्यांना देशात सामावून घेतले जाणार आहे.'' 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com