आमदारकीची स्वप्न पाहणाऱ्या शिवसेना नेत्याला इव्हेंटच्या पोरांनी उचलायला लावलं टेबल 

युवा सेना प्रमुख अर्थातच शिवसेनेचे युवराज आदित्य ठाकरे सध्या जन आशीर्वाद यात्रेनिमित्त दौरा करत आहेत. त्याच्या नियोजनाची जबाबदारी एका 'इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी'कडे आहे. या कंपनीच्या शिकाऊ पोरांनी आयोजक व शिवसेना नेत्यांना चांगलाच घाम फोडला. कार्यक्रमाच्या वेळी अक्षरशः शिवसेना नेते, नगरसेवक व विधानसभेचे इच्छुक उमेदवारांना एकेरीवर झापत टेबल- खुर्च्या मांडण्यास भाग पाडले.
आमदारकीची स्वप्न पाहणाऱ्या शिवसेना नेत्याला इव्हेंटच्या पोरांनी उचलायला लावलं टेबल 

नाशिक : युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा दौरा सध्या इव्हेंट मॅनेजर प्रशांत किशोर यांच्या इव्हेंट कंपनीकडून होत आहे. अठरा- वीस वर्षाची शिकाऊ पोरं त्याचे काम पाहतात. त्यांना सगळेच आखीव रेखीव हवे असते. त्यासाठी व्यासपीठावर बॅनर लावलेल्या नेत्यांनी इव्हेंटच्या पोरांनी अक्षरशः एकेरीत झापले. बॅनर काढायला लावले. 'आम्हाला आदित्य यांना प्रमोट करायचे आहे. तुम्हाला नाही' या शब्दात सुनावले. एव्हढ्यावर थांबले नाही, आमदारकीचे स्वप्न पाहणाऱ्या सभागृह नेते सुधाकर बडगुजर यांना तर त्यांनी टेबल उचलायला लावल्याने त्याची चागंलीच चर्चा झाली. 

युवा सेना प्रमुख अर्थातच शिवसेनेचे युवराज आदित्य ठाकरे सध्या जन आशीर्वाद यात्रेनिमित्त दौरा करत आहेत. त्याच्या नियोजनाची जबाबदारी एका 'इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी'कडे आहे. या कंपनीच्या शिकाऊ पोरांनी आयोजक व शिवसेना नेत्यांना चांगलाच घाम फोडला. कार्यक्रमाच्या वेळी अक्षरशः शिवसेना नेते, नगरसेवक व विधानसभेचे इच्छुक उमेदवारांना एकेरीवर झापत टेबल- खुर्च्या मांडण्यास भाग पाडले. मेळाव्याची वेळ सकाळी अकराची होती. तो सुरु झाला दोनला. त्याची जबाबदारी नाशिक पश्‍चिम विधानसभा मतदार संघातील इच्छुक व पक्षाचे महापालिकेतील नेते सुधाकर बडगुजर यांच्याकडे होती. आयोजकांनी कार्यक्रमाची रूपरेषा ठरवली होती. 

मात्र, या ठिकाणी मुंबई येथून आलेल्या वीस-बावीस वर्षाच्या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीच्या तरुण, तरुणींनी सभास्थानाचा ताबा घेतला. या दरम्यान त्यांनी उपस्थित नेत्यांना एकेरीवर झापत पदाधिकाऱ्यांना चांगलाच घाम फोडला. स्टेज व परिसरातील बॅनर, खुर्च्या, टेबल, साऊंड सिस्टिम याटा आढावा घेत त्यांनी आयोजकांना चांगलेच धारेवर धरले. यावेळी इकडच्या खुर्च्या तिकडे, इकडचा बॅनर तिकडे, तिकडच्या बॅनर इकडे, अशा प्रकारची व्यवस्था स्वतः काही न करता पदाधिकाऱ्यांकडून करून घेण्यात आली. त्यामुळे एरव्ही नागरीक, लहान कार्यकर्ते या प्रत्येकावर गुरकावणाऱ्या नगरसेवक, पदाधिकारी यांना गुमान अपमान गिळावा लागला. ते पाहून नागरीक, कार्यकर्ते मात्र मनातल्या मनात खुश होत चेहऱ्यावरचे हसु लववु शकले नाहीत. 

स्वतः पक्षप्रमुखांनीच इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीकडे जबाबदारी सोपविली होती. याच अर्थ शिवसेनेच्या नेत्यांना आपले काम प्रोफेशनली करता येत नाही असा अविश्‍वासही असावा. त्यामुळे हिडीस फिडीस वागणूक देणाऱ्या या पोरांना काही बोलणे म्हणजे स्वतःच्या पायावर दगड पाडून घेण्यासारखे होते. शेवटी तर कार्यक्रमाचे आयोजक व महापालिकेतील मोठे नेते, एकाच वेळी पती-पत्नी नगरसेवक म्हणून निवडून आलेले व विधानसभेत आमदारकीची स्वप्न पाहणाऱ्या नगरसेवक सुधाकर बडगुजर यांनाच स्टेजच्या खाली असलेले टेबल स्टेजवर ठेवण्यास भाग पाडत कंपनीच्या युवतीने घाम फोडला. विशेष म्हणजे यावेळी याच नेत्यांच्या विनंतीवरुन सभेला आलेला जनसमुदायही उपस्थित होता. त्यामुळे युवा सेना प्रमुखांपेक्षा इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीचीच चर्चा सुरु झाली. 

हा दौरा व कार्यक्रम पक्षाचा होता. त्यामुळे वरिष्ठांच्या सुचनेनुसार काम करणे हा प्रत्येक शिवसेना कार्यकर्त्यांचे कामच आहे. पक्षासाठी टेबल उचलण्यात काहीच गैर नाही. अशी कामे आम्ही सर्व शिवसेना कार्यकर्ते नेहेमीच करतो. समाजकारण हा आमचा पिंड आहे- सुधाकर बडगुजर, माजी सभागृह नेते, शिवसेना. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com