मी सोडा म्हटल्याने ते अजित पवारांना सोडणार नाहीत : छगन भुजबळ  

राज्यात महाविकास आघाडीला विरोध करण्यासाठी भाजप आणि मनसे एकत्र येणार आहेत. तशा हालचाली सुरु झाल्या आहेत. याविषयी विचारल्यावर ते म्हणाले, आधी त्यांना एकत्र तर येऊ द्या. त्यानंतर प्रतिक्रिया देता येईल. आधीच कशाला घाई करता.
Chagan-Bhujbal
Chagan-Bhujbal

नाशिक :  अजित पवार यांच्या संदर्भातील विषय न्यायालयीन आहे. याबाबत मी भाष्य करणार नाही. कारण मी पकडा  म्हणलं तर ते पकडणार नाहीत. मी सोडा  म्हणल्यावर ते काय त्यांना सोडणार नाही, अशी प्रतिक्रिया  राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली . 


श्री. भुजबळ आजपासून नाशिक दौऱ्यावर आहेत.  अजित पवार यांच्याविषयी अँटी करप्शन खाते आणि न्यायालयीन प्रकरणाबाबत प्रश्न विचारण्यात आले तेंव्हा त्यांनी वरील प्रमाणे विधान केले . 


कर्नाटकातील एक संघटना जास्तच वळवळ करतेय. कर्नाटक सरकारने त्यात वेळीच लक्ष घालुन ते थांबवावे. अन्यथा त्याच्या फरा वेगळ्या प्रतिक्रीया उमटू शकतात. ते त्यांना झेपवणार नाही,  या शब्दात  छगन भुजबळ यांनी कर्नाटक सरकारला दिला  .

तानाजी या  चित्रपटाला कर्नाटकात विरोध करण्याचे कारण कळत नाही. गेल्या काही दिवसात तेथील एक संघटना जास्तच वळवळ करतेय. त्यावर तेथील राज्य सरकारने लक्ष घालून ते थांबवले पाहिजे. अन्यथा त्याच्या फार तीव्र प्रतिक्रिया उमटू  शकतात. ते चांगले होणार नाही.

राज्यात महाविकास आघाडीला विरोध करण्यासाठी भाजप आणि मनसे एकत्र येणार आहेत. तशा हालचाली सुरु झाल्या आहेत. याविषयी विचारल्यावर ते म्हणाले, आधी त्यांना एकत्र तर येऊ द्या. त्यानंतर प्रतिक्रिया देता येईल. आधीच कशाला घाई करता. 


"सीएए' कायद्याविषयी सर्वोच्च न्यायालयात जो पर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत आम्ही कोणतिही भूमिका घेणार नाही. यासंदर्भात मला वाटते की, या कायद्याला भाजप वगळता सर्वच पक्ष, संघटनांचा विरोध आहे. त्यामुळे चर्चा करून निर्णय घेतलेला बरे. कोणताही कायदा सरकारने केला अन्‌ लोकांनी त्याला विरोध केला तर त्या कायद्याची अंमलबजावणी महाकठीण होते. त्यामुळे या कायद्याची अंमलबजावणी होईल असं मला वाटत नाही, असेही श्री. भुजबळ म्हणाले . 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com