Essential commodities will not be broken: Satej Patil | Sarkarnama

जीवनावश्‍यक वस्तुंचा तुटवडा होणार नाही : सतेज पाटील 

सुनील पाटील
बुधवार, 25 मार्च 2020

पालकमंत्री श्री पाटील म्हणाले, जिल्हा प्रशासनाच्यावतीने उद्या पाच वॉटसऍप नंबर जाहीर केले जातील. याद्वारे नंबरवर संचारबंदी काळात ज्या-ज्या अडचणी येतील किंवा जीवनावश्‍यक वस्तूंचा पुरवठा होत नसेल तर तो कसा पुरवठा केला जाईल.

कोल्हापूर: जिल्ह्यात जिवनावश्‍यक वस्तूंचा तुटवडा होणार नाही. कोल्हापूर शहरामध्ये भाजी-पाला वॉर्डनिहाय देता येईल का? यासाठी नियोजन केले आहे. त्यापध्दतीने उद्यापासून काही वॉर्ड निहाय भाजीपाला देण्याचे सुरूवात केली जात आहे.

तसेच, बाजार समिती भाजीपाला विक्री करण्यासाठी बाजार समिती येणाऱ्या शेतकऱ्यांना आता तपोवन मैदानातही सोय करण्याबाबत नियोजन केले जात असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज सांगितले.

पाटील म्हणाले, किरकोळ भाजी विक्री करणारे विक्रेते बाजार समिती मध्ये जातात. त्यामुळे येथी गर्दी होते. याचा विचार करून शनिवारपासून (ता.28) मार्केट यार्डसह तपोवन मैदान येथेही व्यवस्था करता येईल का? याचे नियोजन केले जाईल. यामुळे, तपोवन परिसारातील खेडे गावातून येणारे लोक जवळ-जवळ आपली भाजी विकून त्यांना परत लवकर घरी जाता येणार असल्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी सांगितले.

पालकमंत्री श्री पाटील म्हणाले, जिल्हा प्रशासनाच्यावतीने उद्या पाच वॉटसऍप नंबर जाहीर केले जातील. याद्वारे नंबरवर संचारबंदी काळात ज्या-ज्या अडचणी येतील किंवा जीवनावश्‍यक वस्तूंचा पुरवठा होत नसेल तर तो कसा पुरवठा केला जाईल. याचीही माहिती मिळू शकेल. याशिवाय, लोकांची इतर समस्या असेल तर ती लोकांनी त्या नंबरवर संदेश पाठविण्याचे आवाहन श्री पाटील यांनी केले आहे.

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख