25 हजार झाडे तोडून मियावाकी वनीकरणावर भर; मुंबई महापालिकेच्या धोरणावर पर्यावरणप्रेमी नाराज

मुंबईतील मोकळ्या जागांच्या कमतरतेमुळे वृक्षरोपणावर मर्यादा येतात. त्यात सिमेंटच्या जंगलात रस्ते आणि पदपथांवरील वृक्षांभोवती कठडे बांधले आहेत. त्यामुळे पावसाळ्यात झाडे उन्मळून जीवितहानी होते. प्रदूषणाचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी महापालिकेने मियावाकी पद्धतीने वनीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे
Environmentalists Unhappy on Mumbai Corporation Policy
Environmentalists Unhappy on Mumbai Corporation Policy

मुंबई  : मुंबईतील विविध विकास प्रकल्पांसाठी महापालिकेने मागील पाच वर्षांत सुमारे 25 हजार वृक्ष तोडण्यास संमती दिली, परंतु पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी या झाडांच्या बदल्यात मियावाकी पद्धतीने चार लाख रोपांची लागवड केली जाणार असून, त्यासाठी महापालिकेने 2020-21 च्या अर्थसंकल्पात 65 कोटींची तरतूद केली आहे. वृक्षतोड होत असताना 'मियावाकी' वनीकरणावर भर दिला जात असल्याने पर्यावरणप्रेमींमध्ये नाराजी पसरली आहे.

मुंबईतील मोकळ्या जागांच्या कमतरतेमुळे वृक्षरोपणावर मर्यादा येतात. त्यात सिमेंटच्या जंगलात रस्ते आणि पदपथांवरील वृक्षांभोवती कठडे बांधले आहेत. त्यामुळे पावसाळ्यात झाडे उन्मळून जीवितहानी होते. प्रदूषणाचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी महापालिकेने मियावाकी पद्धतीने वनीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअंतर्गत महापालिकेची 65 उद्याने आणि भूखंडांवर वर्षभरात चार लाख झाडे लावली जाणार आहेत. त्याचप्रमाणे खासगी विकासकांचे इमारतीचे आराखडे मंजूर करताना मियावाकी लागवडीचा आग्रह केला जाणार आहे.

मुंबईत मोठ्या प्रमाणावर विकासकामे सुरू आहेत. मागील पाच वर्षांत विकासकामांत अडथळा ठरणारे 25 हजार वृक्ष तोडण्यास महापालिकेने संमती दिली होती. यंदा 3236 झाडांवर कुऱ्हाड पडणार आहे. या झाडांची कमरतता भरून काढण्यासाठी मियावाकी पद्धतीची वृक्षलागवड केली जाणार असल्याचे महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी स्पष्ट केले आहे. उद्यान खात्यासाठी 226.77 कोटींची तरतूद केली असून, त्यापैकी 65 कोटी रुपये 'मियावाकी'वर खर्च केले जाणार आहेत. दरम्यान, त्याबाबत मुंबईकर नाराजी व्यक्त करत आहेत.

वृक्ष प्राधिकरण समितीवर महापालिका प्रशासनाचे नियंत्रण आहे. आयुक्तच या समितीचे अध्यक्ष आहेत. त्यांना 25 हजार झाडे तोडण्याचा निर्णय घेण्याचे अधिकार आहेत. अधिनियमात बदल करून ते अधिकार लोकप्रतिनिधींना देणे आवश्‍यक आहे. मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून तशी मागणी करणार आहे. - यशवंत जाधव, अध्यक्ष, स्थायी समिती

प्रकल्पांच्या नावाखाली पर्यावरणाची होणारी हानी न भरून निघणारी आहे. विकासाच्या नावावर रेटले जाणारे प्रकल्प बिल्डरधार्जिणे आहेत. मियावाकी वृक्षलागवड प्रकल्प हे केवळ गोंडस नाव असून, त्यातून पर्यावरणाचे रक्षण होईल या भ्रमात राहणे चुकीचे आहे. महापालिकेने कोणत्याही वृक्षतोडीला परवानगी देऊ नये. - गिरीश राऊत, निमंत्रक, पृथ्वी रक्षण चळवळ

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com